Delhi Assembly Election 2025: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवणार, याचा खुलासा झाला आहे. याशिवाय, दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांचा मतदारसंघही समोर आला आहे. यंदाही केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, आतिशी त्यांच्या कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
मनीष सिसोदिया यांची जागा का बदलली?अरविंत केजरीवालांनी आजतकच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, पटपडगंजची जागा मनीष सिसोदियांना जिंकता येणार नाही, असे वाटत होते, म्हणून त्यांची जागा बदलली का? यावर केजरीवाल म्हणाले की, तसे अजिबात नाही. मनीष सिसोदिया यांनी अवध ओझांना पक्षात आणले. अवध ओझा हे या देशातील शिक्षण क्षेत्रातील मोठे नाव आहे. मनीष यांनी अवध ओझांना पक्षात आणताना आपली जागा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मनीष सिसोदिया दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
जिंकण्यासाठी निवडणूक लढवतोयगेल्यावेळी मनीष सिसोदिया यांच्या विजयाचे अंतर फक्त 3000 होते, यावर केजरीवाल म्हणाले की, मार्जिन वर-खाली होत राहते. आम्ही जिंकण्यासाठी निवडणूक लढवतो.
आपचे 32 उमेदवार जाहीरदिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. आपने आतापर्यंत 32 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. पहिल्या यादीत 11 तर दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या निवडणुकीत 70 सदस्यीय विधानसभेत 'आप'ने 62 जागा जिंकल्या होत्या. दिल्ली विधानसभेसाठी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणार आहे.