शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मानहानी प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनी मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:13 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानहानीच्या एका प्रकरणामध्ये माफी मागितली आहे. पंजाबमधील अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत केजरीवाल यांनी हा माफीनामा दिला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानहानीच्या एका प्रकरणामध्ये माफी मागितली आहे. पंजाबमधील अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत केजरीवाल यांनी हा माफीनामा दिला आहे. यासंदर्भातील लिखित माफीनामा न्यायालयाला सादर करण्यात आला आहे.गतवर्षी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी विक्रम मजिठिया यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवली होती. त्यावेळी केजरीवाल यांनी मजिठिया यांना ड्र्ग्ज माफिया म्हटले होते. त्यावेळी मजिठिया यांनी केजरीवालांच्या विरोधात न्यायालयात धाव घेत मानहानीचा खटला दाखल केला होता. आता या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, केजरीवाल यांच्यावतीने माफीनाम्याचे पत्र जमा करण्यात आले आहे. आज मजिठिया यांनी केजरीवालांकडून जमा करण्यात आलेले हे पत्र प्रसारमाध्यमांसमोर दाखवले.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आप आता आपल्या नेत्यांवर दाखल असलेले सर्व प्रकारचे मानहानीचे खटले मिटवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मजिठिया यांची केजरीवाल यांनी माफी मागितली आहे. केजरीवाल यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अरुण जेटली आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह अन्य नेत्यांनी मानहानीचे खटले दाखल केले आहेत. या खटल्यांमुळे वेळेचा आणि पैशांचा अपव्यय होत असल्याचे आपच्या नेत्यांचे मत आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPoliceपोलिस