शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अरूणाचल प्रदेशची बातमी-सुधारीत

By admin | Updated: February 20, 2016 00:34 IST

अरुणाचल प्रदेशच्या

अरुणाचल प्रदेशच्या
मुख्यमंत्रिपदी कलिखो पूल
इटानगर : काँग्रेसचे बंडखोर नेते कलिखो पूल (47) यांनी शुक्रवारी रात्री अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल के. पी. राजखोवा यांनी त्यांना येथील राजभवनवर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आणि गेल्या दोन महिन्यांपासूनची तेथील राजकीय अस्थिरता संपुष्टात आली. त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा केला आणि राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली होती.
अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नबम तुकी यांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या पूल यांच्या नेतृत्वाखालील या सरकारला काँग्रेसच्या बंडखोर 19, भाजपच्या 11 व दोन अपक्ष आमदारांचा बाहेरून पाठिंबा आहे. विधानसभेची सदस्यसंख्या 60 आहे. दोन अपक्ष आमदारांचा सरकारमध्ये बहुधा समावेश होईल. तुकी यांना काँग्रेसच्या 26 आमदारांचा पाठिंबा आहे. शपथविधीनंतर पूल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माझ्या सरकारला पाठिंबा देणार्‍या आमदारांशी चर्चा करून मी मंत्रिमंडळाचा विस्तार करीन, असे सांगितले. मात्र त्यांनी त्यासाठी निश्चित तारीख सांगितली नाही. सीमेवरील या राज्यात नव्याने निवडणुका घेता याव्यात यासाठी नव्या सरकारकडून विधानसभा बरखास्त केली जाऊ शकते अशीही चर्चा होती.
केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्या शिफारशीला मान्यता दिली व सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला, असे नवी दिल्लीत गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी नबम तुकी यांनी राष्ट्रपतींची परवानगी मिळविली होती; परंतु ती शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.