शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अरूणाचल प्रदेशातील गाव झाले मालामाल! प्रत्येक कुटुंब झाले कोट्यधीश, जमिनीचा मिळाला प्रचंड मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:33 IST

अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत असलेल्या एका गावाचे भाग्य अचानक फळफळले आहे. त्या गावातील प्रत्येक कुटुंब आज कोट्याधीश झाले आहे. त्या गावाचे नाव बोमजा असून, गावात राहणा-या प्रत्येक कुटुंबाकडे आता किमान १.९ कोटी रुपये आले आहेत.

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत असलेल्या एका गावाचे भाग्य अचानक फळफळले आहे. त्या गावातील प्रत्येक कुटुंब आज कोट्याधीश झाले आहे. त्या गावाचे नाव बोमजा असून, गावात राहणाºया प्रत्येक कुटुंबाकडे आता किमान १.९ कोटी रुपये आले आहेत.चीन आणि भूतानच्या सीमेलगत तवांग जिल्ह्यात असलेल्या या गावामध्ये भारतीय लष्कराला आपला तळ उभारण्याचे ठरवले आहे. त्यासाठी बोमजा गावातील तब्बल २00 एकर जमीन लष्कराने संपादित केली. संरक्षण मंत्रालयाने २00 एकर जमिनीचा मोबदला म्हणून, गावाला ४0 कोटी ८0 लाख रुपये दिले. गंमत म्हणजे गावात केवळ ३१ कुटुंबे राहत असल्याने प्रत्येक कुटुंबाला घसघशीत मोबदला मिळाला. बोमजा गावाती एका कुटुंबाला तर ६कोटी ७३ लाख इतकी भरपाई मिळाली आहे. त्या गावाची सर्वाधिक जमीन गावामध्ये होती. या बोमजा गावाचा आता आशियातील समृद्ध गावांच्या यादीत समावेश झाला आहे. सीमेवरील चीनच्या हालचाली वाढत असल्याचे पाहून बोमजामध्ये लष्करी तळ उभारण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला. (वृत्तसंस्था)रक्कम जपून वापरा : बोमजा गावातील ३१ कुटुंबांपैकी २९ कुटुंबांना १ कोटी ९ लाख रुपये भरपाईपोटी मिळाले. उरलेल्या दोनपैकी एका कुटुंबाला २ कोटी ४५ लाख आणि एका कुटुंबाला ६.७३ कोटी रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. या कुटुंबांनी ही रक्कम जपून वापरावी आणि अन्यत्र शेतीसाठी जमिनीमध्येच गुंतवावी, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी जवळच्या गावातील जमिनी त्यांना मिळू शकतील का, याचा शोध सुरू आहे.गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माढापूर गावही अशाच प्रकारे समृद्ध झाले आहे. त्या ठिकाणीही लष्कराने काही कामे सुरू केली आहेत.अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी एका समारंभात गावकºयांना त्यांच्या हक्काच्या रकमेचे धनादेश दिले.केंद्राच्या मदतीने राज्याच्या विकासाला गती मिळत असून,रेल्वे, हवाई मार्ग आणि रस्त्यांच्या विकासावर लक्ष दिले जात आहे. तसेच डिजिटल क्षेत्रातही राज्य प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे पेमा खांडू म्हणाले.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेश