अरूणभाई गुजराथी यांनी घेतली सुरेशदादांची भेट ओघ सुरूच : राष्ट्रवादीचे नगरसेवकही भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 21:26 IST
जळगाव: राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी मंगळवारी ७, शिवाजीनगर येथे येत सुरेशदादांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही सायंकाळी सुरेशदादांची भेट घेत विचारपूस केली. दिवसभर जिल्ातून नेते, कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच होता.
अरूणभाई गुजराथी यांनी घेतली सुरेशदादांची भेट ओघ सुरूच : राष्ट्रवादीचे नगरसेवकही भेटीला
जळगाव: राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी मंगळवारी ७, शिवाजीनगर येथे येत सुरेशदादांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही सायंकाळी सुरेशदादांची भेट घेत विचारपूस केली. दिवसभर जिल्ातून नेते, कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच होता. नगरसेवकांनी घेतली भेटराष्ट्रवादीचे नगरसेवक तसेच नगरसेविका पती यांनी मंगळवारी सायंकाळी सुरेशदादांची भेट घेत विचारपूस केली. त्यात चंद्रकांत कापसे, गटनेता सुरेश सोनवणे, राजू मोरे, शरीफ पिंजारी, दुर्गेश पाटील, चेतन सनकत, मधुकर काळे, उत्तम शिंदे, लता मोरे, तसेच शोभा बारी यांचा मुलगा अतुल बारी, नगरसेविका मुक्तार रसुल पठाण यांचा मुलगा जाकीर पठाण यांचा समावेश होता. या भेटीप्रसंगी महापौर नितीन ला हेदेखील उपस्थित होते. व्ही.डी.पाटील भेटीलाराज्याचे नागपुर विभागाचे माहिती अधिकार आयुक्त व्ही.डी. पाटील यांनीही ७, शिवाजीनगर येथे येत सुरेशदादांची भेट घेऊन विचारपूस केली. या खेरीज राष्ट्रवादीचे विनोद तराळ, शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा प्रमुख दीपक गवते, उपजिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुरेशदादांची भेट घेऊन विचारपूस केली.