नवी दिल्ली : भारताने सध्या फ्रान्समध्ये राजदूत असलेल्या अरुणसिंग यांना अमेरिकेतील राजदूत म्हणून नियुक्त केले असून, त्यासंबंधीचा करार अमेरिकन सरकारकडे पाठविला आहे. एस. जयशंकर यांची विदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याने, त्यांची जागा अरुणसिंग हे घेतील.सध्या बहरीन येथे राजदूत असलेले मोहनकुमार यांना फ्रान्सला पाठविले जाईल. अरुणसिंग यांचे नाव पाठविल्यानंतर ओबामा प्रशासनाकडून उत्तराची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिलमध्ये पॅरिस भेटीवर जात असून, त्यानंतर नवे फेरबदल हाती घेतले जातील.
अरुणसिंग अमेरिकेत भारताचे नवे राजदूत
By admin | Updated: March 1, 2015 23:51 IST