नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यसभेच्या नेतेपदी निवड झालेले अरुण जेटली यांच्यावर लवकरच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असल्याचे वृत्त ‘द वायर’ या संकेतस्थळाने दिले आहे. ही शस्त्रक्रिया सिंगापूरमध्ये होणार असल्याचीही माहिती असून, एम्स हॉस्पिटलचा पर्यायही जेटलींसमोर उपलब्ध आहे.कसलाही संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असल्याचेही समजते. त्यामुळेच राज्यसभा सदस्य म्हणून निवड होऊनही अद्याप त्यांनी शपथ घेतलेली नाही. जेटली यांना मधुमेह असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. सध्या आपल्या खात्याचा कारभार घरूनच सांभाळत असल्याचेही कळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
अरुण जेटलींवर होणार किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 07:08 IST