शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Arun Jaitley's Biography : 28 डिसेंबर 1952 ते 24 ऑगस्ट 2019... अरुण जेटलींची 'बायोग्राफी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 13:37 IST

देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

नवी दिल्ली - देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी (24 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये 28 डिसेंबर 1952 रोजी झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी 26 मे 1014 ते 14 मे 2018  या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय 13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय 3 जून 2009 ते 26 मे 2014  या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. 

1952 ते 2019... अरुण जेटलींची 'बायोग्राफी' 

1952 - नवी दिल्लीत जन्म.

1957 - शाळेत प्रवेश. येथेच त्यांच्या विचारसरणीला व राजकीय विचारांना दिशा मिळाली.

1969 - व्यावसायिक कारकीर्दीची पायाभरणी करणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतली. फर्डा वक्ता व विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष म्हणून नाव कमावले.

1974 - काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दिल्ली विद्यापीठात अभाविपची उमेदवारी घेऊन विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी निवड.

1975 - आणीबाणीविरुद्ध बंड पुकारल्याने 19 महिन्यांची जेल. कारावासात विविध व्यक्तींच्या सहवासाने व्यक्तिमत्त्वाला उभारी मिळाली.

1977 - आणीबाणीच्या असंतोषातून लढल्या गेलेल्या 1977 च्या निवडणुकीत देशभरात प्रचार केला. लोकतांत्रिक युवा मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक पदावरून जनता पार्टीसाठी धडाडीने बाजू मांडली.

1980 - भारतीय जनता पक्षात प्रवेश.

1982 - संगीता यांच्याशी विवाहबद्ध.

1983 - सोनाली या कन्येचा जन्म.

1989 - पुत्र रोहनचा जन्म.

1990 - अतिरिक्त सॉलिसीटर जनरल पदावरून बोफोर्स खटला लढला.

1991 - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य झाले.

1991 - संयुक्त राष्ट्रांत भारतातून गेलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य.

1999 - दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटना अध्यक्षपदी निवड.

2000 - केंद्रीय मंत्रिमंडळात विधि, न्याय व कंपनी व्यवहार मंत्रालयाची धुरा.

2001 - जहाज बांधणी मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार. बंदरांच्या आधुनिकी-करणावर लक्ष

2002 - भाजप सरचिटणीस

2003 - मेक्सिकोत जागतिक व्यापार संघटनेच्या चर्चेसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व.

2006 - गुजरातमधून राज्यसभेवर फेरनिवड.

2009 - राज्यसभेत विरोधी पक्षनेते. अनेक मुद्यांवर भाजपची आक्रमक भूमिका मांडली. बीसीसीआय उपाध्यक्ष.

2012 - राज्यभेवर पुन्हा निवड. पुन्हा विरोधी पक्षनेतेपदी निवड.

2014 - माहिती व प्रसारण मंत्रालयाचा पदभार घेतला. अर्थ, संरक्षण व कॉर्पोरेट व्यवहारमंत्री.

2018 - उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर फेरनिवड

2019 - दु:खद निधन.

अरुण जेटली यांना सॉफ्ट टिश्यू कॅन्सर हा दुर्मीळ आजार झाला होता. या आजारावरील उपचारासाठी ते 13 जानेवारी रोजी अमेरिकेत गेले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ते भारतात परत आले होते. दरम्यान, जेटलींच्या अनुपस्थितीत पियूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर अरुण जेटली यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात जेटली यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता.

 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपाdelhiदिल्ली