शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

किडनी प्रत्यारोपणानंतर अरुण जेटलींना एम्समधून डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 17:00 IST

जेटलींनी मानले डॉक्टरांचे आभार

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना एम्स रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जेटली यांच्यावर 14 मे रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. जेटली यांच्यावर उपचार सुरू असल्यानं अर्थ खात्याचा प्रभार पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आला होता. तीन आठवडे एम्समध्ये उपचार घेतल्यावर जेटली आज दुपारी घरी परतले. रुग्णालयातून निघताना त्यांनी डॉक्टर, परिचारिका यांचे आभार मानले. घरी आल्यामुळे आनंद वाटतोय, असं ट्विट अरुण जेटली यांनी केलं. 'गेल्या तीन आठवड्यांपासून माझी काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांचे मी आभार मानतो. याशिवाय माझी प्रकृती सुधारण्यासाठी मला शुभेच्छा देणाऱ्या माझ्या मित्रांचा, सहकाऱ्यांचा आणि हितचिंतकांचाही मी आभारी आहे,' असंही जेटलींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अर्थ खात्याची धुरा सांभाळणाऱ्या जेटली यांना 12 मे रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर 14 मे रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. एम्समधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेटली यांच्या नातेवाईकांधील एका मध्यमवयीन महिलेनं त्यांच्यासाठी किडनी दान केली. जेटली यांच्यावर 20 जणांच्या टीमनं शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर संसर्ग टाळण्यासाठी जेटलींना एका वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. याच वॉर्डमध्ये असताना त्यांनी मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त फेसबुक पोस्ट लिहिली होती.  

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली