शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

"काश्मीरमध्ये पुन्हा लागू व्हावे कलम ३७०’’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे विधान

By बाळकृष्ण परब | Updated: October 16, 2020 22:44 IST

P.Chidambaram statement News : जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने मुख्य प्रवाहातील पक्ष आणि आणि जम्मू काश्मीरमधील जनतेकडे ते देशविरोधी असल्याच्या नजरेने पाहणे बंद केले पाहिजेकेंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी मनमानी पद्धतीने घेतलेला असंवैधानिक निर्णय मागे घेतला पाहिजेकाँग्रेस जम्मू काश्मीरमधील जनतेचे अधिकार परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करून ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीची परिस्थिती बहाल करावी या मागणीसाठी काश्मिरी पक्षांनी आघाडी केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यात यावे, असे विधान केले आहे. तसेच या मागणीसाठी काश्मिरी पक्षांनी केलेल्या आघाडीलाही पाठिंबा दिला आहे.पी. चिदंबरम यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे.

केंद्र सरकारने मुख्य प्रवाहातील पक्ष आणि आणि जम्मू काश्मीरमधील जनतेकडे ते देशविरोधी असल्याच्या नजरेने पाहणे बंद केले पाहिजे. काँग्रेस जम्मू काश्मीरमील जनतेचे अधिकार परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी मनमानी पद्धतीने घेतलेला असंवैधानिक निर्णय मागे घेतला पाहिजे, असे चिदंबरम म्हणाले.

दरम्यान, जम्म-काश्मीरमधील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी गुरुवारी एका बैठकीचे आयोजन करत जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी काश्मिरी पक्षांनी एका आघाडीची घोषणा केली आहे. ही आघाडी कलम ३७० च्या मागणीसांठी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा सुरू करणार आहे.यासाठीची बैठक नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला पीडीपीच्या अध्यक्षा महेबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फ्रन्सचे सज्जाद लोन, पीपल्स मुव्हमेंटचे नेते जावेद मीर आणि माकपाचे नेते मोहम्मद युसूप तारिगामी हे उपस्थित होते.

टॅग्स :Article 370कलम 370P. Chidambaramपी. चिदंबरमJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार