शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

म्हशीच्या श्वसननलिकेत दडलेय सांधेदुखीचे औषध; संशोधनातून नवं तंत्रज्ञान विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 06:39 IST

माफसूच्या संशोधन प्रक्रियेस मिळाले पेटंट, ऑस्टियोआथ्रॉटिस हा एक सांध्याचा रोग आहे. ज्यामुळे सांधे वेदनादायक आणि कडक होतात. शरीराचा कोणताही सांधा ऑस्टियोआथ्रॉटिसमुळे प्रभावित होऊ शकतो 

जितेंद्र ढवळे नागपूर - बदलत्या सुखासीन जीवनशैलीमुळे जगभरात सांधेदुखीच्या वेदनांमुळे लाखो लोक त्रस्त आहेत. एका अहवालानुसार ७ पैकी एका प्रौढाला या आजाराने ग्रासले आहे. ‘कॉण्ड्रोयटिन सल्फेट’ हे या आजारावरील औषध आहे. म्हशीच्या श्वसननलिका आणि कान यांच्या कार्टिलेजमधून (कुर्चा) ‘कॉण्ड्रोयटिन सल्फेट’ तयार करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) विकसित केली आहे. माफसूच्या या संशोधन प्रक्रियेला भारतीय पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे. त्यामुळे सांधेदुखीने त्रस्त असणाऱ्यांना दिलासा मिळेल.

तंत्रज्ञान विकसितचाळिशीचा उंबरठा ओलांडल्यानंतर ऑस्टियोआथ्रॉटिस लक्षणे आढळून येतात. या आजारावर प्रभावी औषधी शोधण्यासाठी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि माफसूच्या वतीने अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्पांतर्गत कॉण्ड्रॉयटिन सल्फेट निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. 

कॉण्ड्रॉयटिन सल्फेटचा अर्क हा कत्तलखान्यातील प्राण्यांच्या मृदू कार्टिलेजपासून तयार केला जातो. (उदा. म्हशीचे कान व शार्क माशाचे कार्टिलेज) माफसूच्या मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभागात याबाबत तीन वर्षे संशोधन करण्यात आले.

ऑस्टियोआथ्रॉटिस हा एक सांध्याचा रोग आहे. ज्यामुळे सांधे वेदनादायक आणि कडक होतात. शरीराचा कोणताही सांधा ऑस्टियोआथ्रॉटिसमुळे प्रभावित होऊ शकतो. हात, गुडघा आणि मांडी हे लहान सांधे सामान्यत: प्रभावित होतात. माफसूने म्हशीच्या श्वसनलिका आणि कान यांच्या कार्टिलेजमधून ‘कॉण्ड्रोयटिन सल्फेट’ तयार करण्याची प्रक्रिया विकसित केली आहे. यास पेटंटही मिळाले आहे. यामुळे विद्यापीठ आणि औषधनिर्माता कंपनीने सामंजस्य करार करून या संशोधनाला वास्तवात साकारणे शक्य झाले आहे.-प्रा. रवींद्र झेंडे, विभागप्रमुख, पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई