पतीचा पत्नीवर शस्त्राने हल्ला न्यायालयासमोरची घटना: आरोपीला पोलिसांकडून अटक
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
श्रीरामपूर : पत्नीने न्यायालयात दाखल केलेला खटला मागे घेण्याच्या कारणावरुन पतीने न्यायालयासमोर रस्त्यावर अडवून शिवीगाळ केली. तसेच धारदार शस्त्राने हातावर व पाठीवर मारुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद मथुरा दिलीप गांगुर्डे (हल्ली रा. हरेगाव) या महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन आरोपी पतीविरुध्द मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पतीचा पत्नीवर शस्त्राने हल्ला न्यायालयासमोरची घटना: आरोपीला पोलिसांकडून अटक
श्रीरामपूर : पत्नीने न्यायालयात दाखल केलेला खटला मागे घेण्याच्या कारणावरुन पतीने न्यायालयासमोर रस्त्यावर अडवून शिवीगाळ केली. तसेच धारदार शस्त्राने हातावर व पाठीवर मारुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद मथुरा दिलीप गांगुर्डे (हल्ली रा. हरेगाव) या महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन आरोपी पतीविरुध्द मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मथुरा दिलीप गांगुर्डे ही महिला सध्या माहेरी हरेगावला राहते. तिचा विवाह दिलीप एकनाथ गांगुर्डे (रा. गायकवाड वस्ती, बेलापूर बुद्रूक) याच्याबरोबर झाला. सासरी नांदत असताना मानसिक छळ व मारहाण केल्याप्रकरणी तिने पतीविरुध्द न्यायालयात फिर्याद दिली आहे. या खटल्याची न्यायालयात २५ एप्रिलला तारीख होती. तारखेचे न्यायालयीन काम संपल्यानंतर सकाळी ११.३० वाजता मथुरा या माहेरी हरेगावला जाण्यासाठी न्यायालयाबाहेर पडल्या. न्यायालयासमोरच रस्त्यावर आरोपी दिलीप गांगुर्डे याने अडविले. माझ्या विरोधात न्यायालयात दाखल खटला मागे घे, नाही तर जिवंत मारुन टाकीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. हातातील धारदार शस्त्राने पाठीवर व बोटावर मारले. लाथाबुक्क्याने मारहाण केली. घटनेनंतर गर्दी जमली. न्यायालयात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. पत्नीच्या फिर्यादीवरुन दिलीप गांगुर्डे विरुध्द मारहाणीचा भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस नाईक गव्हाणे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)