शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगात होतेय केजरीवालांचे खच्चीकरण; संजय सिंह यांचा आरोप, सुविधा काढल्या, कुटुंबियांना भेटण्यास मज्जाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 05:20 IST

केजरीवाल यांना त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचे सिंह यांनी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मनोधैर्य खचविण्यासाठी तिहार तुरुंगात कायद्याने मिळणाऱ्या किमान सुविधा आणि अधिकार उघडपणे हिरावून घेतल्या जात असल्याचा आरोप शनिवारी आम आदमी पार्टीचे नेते खासदार संजय सिंह यांनी केला. तुरुंगाच्या नियमांनुसार अतिशय जहाल आरोपींच्याही भेटी समोरासमोर करण्याचा अधिकार तुरुंग प्रशासनाला असतो. पण केजरीवाल यांना त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचे सिंह यांनी सांगितले. 

केजरीवाल यांच्यासोबत भेटीसाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केलेला अर्ज मंजूर केल्यानंतर ऐनवेळी तो रद्द करण्यात आला. सुरक्षेच्या कारणामुळे एवढ्या अल्प काळात ही भेट घडवून आणता येत नसल्याचे तिहार प्रशासनाकडून सांगण्यात आले. तिहार तुरुंगात महत्त्वाच्या व्यक्तींच्या यापूर्वी अशा पद्धतीने किती भेटी झाल्या, प्रकाश सिंह बादल मुख्यमंत्री असताना त्यांची तुरुंगातील भेट कशाप्रकारे घडवून आणली गेली होती, हेही केंद्राने सांगावे, असे आव्हान संजय सिंह यांनी दिले. 

इथेच सुब्रतो राय सहारा यांना दिल्या सर्व सुविधायाच तुरुंगात सुब्रतो राय सहारा यांच्या इंटरनेट, फोनसह सर्व कार्यालयीन सुविधांसह बैठकी व्हायच्या. पण केजरीवाल यांना अपमानित करून मनोधैर्य खचविण्याच्या उद्देशाने हे सगळे अमानवीय प्रकार सुरू असल्याचा आरोप सिंह यांनी केला. आपण दिल्लीचे खासदार असूनही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले.

आंबेडकर जयंतीनिमित्त ‘संविधान बचाओ’देशाला विरोधी पक्षविहीन बनवून एका पक्षाची हुकूमशाही प्रस्थापित करणे, देशाची संसद आणि राज्यांमधील विधानसभांसह निष्पक्ष निवडणुकांची हमी देणारा निवडणूक आयोग आणि केंद्रीय तपास संस्थांना आपल्या मुठीत ठेवणे हा राज्यघटना आणि लोकशाहीवरील हल्ला नव्हे तर काय आहे? अशा शब्दात आपचे नेते गोपाल राय यांनी भाजपवर हल्ला चढविला. पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दिल्लीसह २४ राज्यांच्या राजधान्यांमध्ये ‘संविधान बचाओ’चा संकल्प घेण्याचे ठरविले आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीAam Admi partyआम आदमी पार्टी