शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 11:28 IST

Messi Event Chaos Kolkata: मेस्सी इव्हेंटमधील गोंधळानंतर राजकारण तापले! आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची ममता बॅनर्जींना अटक करण्याची मागणी. बंगालमधील 'व्हीआयपी संस्कृती'वर टीका.

फुटबॉल जगतातील महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱ्यात सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या गोंधळाची जबाबदारी घेत राज्याच्या गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच अटक करावी, अशी थेट मागणी आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी केली आहे.

शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सरमा यांनी पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र टीका केली. "कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात झालेला गोंधळ हे दर्शवतो की, राज्यात कायद्याचे राज्य पूर्णपणे कोलमडले आहे," असे सरमा म्हणाले.

'गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना अटक करा' मेस्सीला पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी हजारो रुपये खर्च करून तिकीट खरेदी केले होते, मात्र व्हीआयपी संस्कृतीमुळे मेस्सी मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गराड्यातच राहिला. त्यामुळे प्रेक्षकांना त्याची साधी झलकही पाहता आली नाही. यावर संताप व्यक्त करत सरमा म्हणाले, "राज्याच्या गृहमंत्री आणि कोलकाता पोलीस आयुक्तांना या अपयशासाठी सर्वप्रथम अटक करायला हवी."

मेस्सीसारखा जागतिक आयकॉन कोलकातामध्ये असताना, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारे अराजकता निर्माण होणे हे बंगालसाठी अत्यंत लज्जास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. इतर राज्यांमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे झालेले यशस्वी व्यवस्थापन आणि बंगालमधील गोंधळ यांची तुलना करून, सरमा यांनी ममता बॅनर्जी यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण? मेस्सीच्या पहिल्या वहिल्या भारत दौऱ्यातील कोलकाता लेगमध्ये, सॉल्ट लेक स्टेडियममध्ये तो अवघ्या काही मिनिटांसाठी उपस्थित होता. परंतु, व्हीआयपी लोकांनी त्याला पूर्णपणे वेढल्यामुळे चाहत्यांना त्याला पाहताच आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने स्टेडियममध्ये तोडफोड आणि गोंधळ घातला. या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी चाहत्यांची माफी मागत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत आणि मुख्य आयोजकाला अटकही करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Arrest Mamata Banerjee: Assam CM Demands Action Over Messi Stadium Chaos

Web Summary : Assam CM Himanta Sarma demands Mamata Banerjee's arrest over chaos during Messi's Kolkata stadium visit. Sarma criticizes West Bengal's law and order, citing mismanagement and VIP culture that prevented fans from seeing Messi, calling the situation shameful for Bengal.
टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीMamata Banerjeeममता बॅनर्जी