शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक

By admin | Updated: July 10, 2017 15:30 IST

जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथेून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 10 - जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथेून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. संदीप शर्मा उर्फ आदिल असं या दहशतवाद्याचं नाव आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले की, 1 जुलै रोजी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लश्करीचा खात्मा करण्यात आला. संदीप शर्मादेखील त्याच घरात होता, जेथे लश्करीनं लपून राहिला होता.  एटीएम लुटणे व अन्य दहशतवादी कारवायांमध्ये संदीपचा सहभाग आहे.  
 
काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले राम शर्मा यांचा मुलगा संदीप शर्माला पोलिसांनी मुझफ्फरनगर येथून अटक केली. शिवाय संदीपनं स्वतःचे नाव बदलून आदिले असे ठेवले होते, अशीही माहिती समोर आली आहे.  
 
दहशतवादी संदीप शर्मा हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. शोपूरमधील शकूर नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून तो लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात होता.  संदीप 2012 काश्मीर खो-यात आला होता. त्यानंतर 2017 मध्ये तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला. संदीपवर शस्त्रास्त्र लुटणं, दहशतवादी हल्ले घडवणे यांसारखे आरोप आहेत, अशी माहितीदेखील खान यांनी दिली. 
 
दरम्यान, काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा दलानं 1 जुलै रोजी झालेल्या चकमकीत लष्कर -ए- तोयबाच्या कमांडर बशीर लश्करीसहीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गेल्या महिन्यात अचबल येथे पोलीस दलावर झालेल्या हल्ल्यात बशीरचा सहभाग होता. या हल्ल्यात पोलीस स्टेशनचे प्रभारी फिरोज अहमद डार यांच्यासहीत 6 पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. यावेळी दहशतवाद्यांनी शहिदांच्या मृतदेहाची विटंबनाही केली होती.  
 
यानंतर 1 जुलै रोजी लष्कर कमांडर बशीर लश्करीचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळालं आहे. बशीर लष्करीसोबत अन्य दहशतवादी आजाद मलिकलाही ठार करण्यात आले.  जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.