शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अर्णव गोस्वामींच्या चॅनलला २० लाखांचा दंड; 'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाची कारवाई

By मोरेश्वर येरम | Updated: December 23, 2020 11:42 IST

'यूके'मधील हिंदी भाषिकांपर्यंत 'रिपब्लिक भारत' वाहिननीचं प्रसारण पोहोचविण्यासाठीचं लायसन्स असलेल्या 'वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क'ला 'यूके'च्या प्रसारण मंडळानं २० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे.

ठळक मुद्देअर्णव गोस्वामी यांच्या 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीला दणका'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाकडून २० लाखांचा दंडपाकिस्तान विरोधात द्वेष भावना पसरविण्याचा ठपका

नवी दिल्ली'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या 'रिपब्लिक भारत' या हिंदी वृत्तवाहिनीला 'यूके'च्या प्रसारण नियामक मंडळाने २० लाखांचा दंड ठोठावला आहे. पाकिस्तानी लोकांबद्दल द्वेष आणि त्याचा प्रचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

'यूके'मधील हिंदी भाषिकांपर्यंत 'रिपब्लिक भारत' वाहिननीचं प्रसारण पोहोचविण्यासाठीचं लायसन्स असलेल्या 'वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क'ला 'यूके'च्या प्रसारण मंडळानं २० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. एखाद्या समाजाबद्दल किंवा द्वेषाची भावना निर्माण होईल असे कार्यक्रम यापुढे वाहिनीवर चालवले जाणार नाहीत याची लेखी हमी देखील देण्याचे आदेश 'रिपब्लिक'ला देण्यात आले आहेत. 

अर्णव गोस्वामी यांच्या 'पूछता है भारत' या टीव्ही शोमध्ये ६ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या चर्चेबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गोस्वामी यांच्याकडून पाकिस्तानी नागरिकांवर वारंवार हल्ला आणि त्यांच्याविरोधात समाजात द्वेष पसविण्याचं काम केल्याचं 'ऑफकॉम'ने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये ऑगस्ट २०१९ पासून 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीचं प्रसारण सुरू आहे. या दरम्यान 'पूछता है भारत' या कार्यक्रमावर यूकेच्या प्रसारण नियामक मंडळाचं सातत्यानं लक्ष होतं. दैनंदिन पातळीवर हा कार्यक्रम चालवला जात असून त्याचं भाषांतर करुन आता लक्ष ठेवलं जाणार असल्याचं ऑफकॉमने म्हटलं आहे. 

याआधीही २२ जुलै २०१९ रोजी भारताच्या 'मिशन चांद्रयान-२' बाबतच्या शोमध्ये अर्णब गोस्वामी यांच्यासोबत तीन भारतीय आणि तीन पाकिस्तानी पाहुणे चर्चेसाठी बोलविले होते. या चर्चेत भारताच्या अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबाबत पाकिस्तानशी तुलना केली गेली. भारताविरोधात पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया केल्या जातात असा आरोप  देखील यामध्ये करण्यात आला, अशी नोंद ऑफकॉमने केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये कलम ३७० च्या मुद्द्यावरुन तणावाची परिस्थिती असतानाच अशा टेलिव्हिजन कार्यक्रमांचं आयोजन करुन तणावात भर टाकण्याचं काम केलं गेलं, असा ठपका 'रिपब्लिक भारत'वर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRepublic TVरिपब्लिक टीव्ही