शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus ; कोरोना विषाणूशी लढण्यास लष्कर सज्ज ;लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 19:02 IST

देशातील लष्कराच्या रूग्णालयातही कोरोना विषाणूच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहीती  इंटिग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकलच्या  उपप्रमुख लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी लोकमतला दिली. दे

निनाद देशमुखपुणे :  कोरोना विषाणूचा सामना करायला केंद्र तसेच राज्यस्तरावरील यंत्रणेसोबत लष्करी यंत्रणा सज्ज आहे. या सर्व यंत्रणा एकत्र काम करत आहेत. आपातकालीन परिस्थतीतीसाठी लष्कर सज्ज आहे. देशातील लष्कराच्या रूग्णालयातही कोरोना विषाणूच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहीती  इंटिग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकलच्या  उपप्रमुख लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी लोकमतला दिली.देशात कोरोनाचे रूग्ण आढळले आहे. चीन तसेच इतर देशातून लष्कराच्या साह्याने भारतीय नागरिकांना देशात आणण्यात आले. या नागरिकांसाठी अनेक कॅम्प लष्करातर्फे लावण्यात आले आहे. कोरोना संदर्भात लष्कराची कशी तयारी आहे या संदर्भात कानिटकर म्हणाल्या, नागरिकांनी कोरोनाची भीती बाळगायची गरज नाही. आपल्याकडे स्वाईन फ्लू सारखे अनेक संसर्गजन्य आजार आले आणि गेले. मात्र, त्यासाठी पॅनिक होण्याची गरज नाही.  भारतीय जवानांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये या करिता उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, 'कोरोनाच्या निवारणासाठी देशभर लष्करी वैद्यकीय विभागातून जी काही मदत लागेल ती आम्ही देणार आहोत. अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा सरकारचे सर्वत्र लक्ष असते. आम्ही जवानांना  सूचना दिल्या आहेत की सारखे हात धुवावेत, स्वछता राखावी.  सर्दी आणि इतर संसर्गजन्य आजार झाले तर मास्क वापरावेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. होळी खेळूच नये असे सांगितले नसले तरी गर्दीत न जाण्याचा सल्ला मात्र दिला आहे.कानिटकर म्हणाल्या, देशात अनेक विषाणूजन्न आजार बळावत असतात.

स्वाईन फ्लू, बर्ड प्लू तसेच अनेक आजारांचा फैलाव होत असतो. अशा परिस्थीतीत त्यांचे वेळेवर निदान होणे गरजेचे असते. पुण्यात असलेल्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत याची तपासणी होते. मात्र, मोठ्या प्रमाणात नमुने आल्यास त्यांचे निदान होण्यास उशीर होतो. आयसीएमआरच्या अंतर्गत सगळी कडे प्रभावी यंत्रणा निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न आहे. लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक यांनीही त्या संदर्भात सुचना केल्या आहेत. यामुळे वेगवेळळळ्या स्तरावरच्या प्रयोगशाळा देशात तयार करण्यात येत आहेत. या अंतर्गत लष्करात १० प्रयोगशाळा असतील. याचे समन्वय पुण्यातीळ लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाIndian Armyभारतीय जवानMedicalवैद्यकीय