शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

लष्कराच्या ऑर्डर्सना ‘स्वदेशी’ने उशीर; परदेशी कच्चा मालही लवकर मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:09 IST

संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या अहवालातून खुलासा; सरकारी कंपन्याचा स्वायत्ततेवर जोर

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात स्वदेशी बनावटीचे अस्त्र, विमाने बनविण्यावर जास्त भर दिला जात असल्यामुळे लष्कराची ऑर्डर निश्चित वेळेत पूर्ण होण्यात अडसर येत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राधामोहन सिंग यांनी गेल्या मार्च महिन्यात लोकसभेच्या सभापटलावर दहावा रिपोर्ट मांडला होता. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

लष्करी साहित्यांच्या निर्मितीत भारताला आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा भर आहे. सरकारी कंपन्या स्वायत्ततेवर जोर देतात आणि काही महत्त्वाच्या सुट्या भागांसाठी इतर देशांवर अवलंबून आहेत. या कारणांमुळे लष्कराची ऑर्डर वेळेत पूर्ण होत नाही, असे दिसून येत  आहे.

विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट

नेमकी कोणती उपकरणे तयार करतात या कंपन्या?

सार्वजनिक क्षेत्रातील नऊ कंपन्यांकडून लष्कराला युद्धसामुग्री, हत्यारे आणि दारूगोळा पुरविला जातो. यात बंदुकीच्या गोळ्या, गोलाबारूद, टँक, बख्तरबंद वाहन, हेवी व्हेईकल, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, युद्धपोत, पाणबुडी, मिसाईल, विशेष प्रकारचे स्टील, बुलेटप्रूफ जॅकेट, इलेक्ट्राॅनिक उपकरणे आणि रणगाड्यांचा समावेश आहे.

कंपन्या आणि त्यांच्याकडील ऑर्डर्स

एचएएल : ऑर्डर : लाईट कॉम्बट एअरक्राफ्ट (एलसीए), ‘एमके१ए’ लढाऊ

विमान, हिंदुस्तान टर्बो ट्रेनर (एचटीटी-४०), डोर्नियर (डीओ-२२८)

I ऑर्डर्सचे मूल्य : ९२,७७५ कोटी रुपये I डेडलाइन : मार्च २०३३

बीईएल : ऑर्डर : जमिनीवरून हवेत लांब पल्ल्याचा मारा करण्यात सक्षम, क्षेपणास्त्रे  (एलआरएसएएम) प्रणाली, वेपन लोकेटिंग रडार प्लेन्स, एअर डिफेन्स कंट्रोल अँड रिपोर्टिंग सिस्टम, आकाश वेपन सीस्टम. I ४२,३६६ कोटी रुपये I डिसेंबर २०३३

मिधानी : बीआर जॅकेट I ३५.८६ कोटी रुपये I जून २०२५

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड : पी१५बी (विशाखापट्टनम श्रेणी मिसाइल डिस्ट्रॉयर), पी१७ए (निलगिरी श्रेणी स्टील फ्रिगेट) I ६०,९६९ कोटी रुपये I फेब्रु. २६

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड : पी-१७ एफ्रिगेट, सर्वे व्हेसेल लार्ज (एसबीएल), अँटी-सबमरीन वारफेअर शॅलो वाटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी), नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल व्हेसेल (एनजीओपीव्ही) I २७,७३१ कोटी I मे २८

गोवा शिपयार्ड लिमिटेड : पी11356 फ्रिगेट, नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर गस्त व्हेसल, प्रदूषण नियंत्रण व्हेसल I २१,१४० कोटी I सप्टेंबर २०२९

हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड : डाइविंगस पोर्ट व्हेसल, सेमी-सबमर्सिबल पोंटून, फ्लीट सपोर्ट शिप I २१,९३६ कोटी I मार्च २०३०

भारत डायनामिक्स : कोंकर्स-एम, आकाश, ॲस्ट्रा एमके-I, मिलान २टी. I १४,८५३ कोटी रुपये I

मे २०२९

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान