शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

लष्करी अधिकाऱ्याने २१ वर्षांपूर्वीचे छायाचित्र दिले भेट, मोदी भावुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 08:56 IST

गुजरातच्या सैनिकी शाळेतील सोहळ्यात पंतप्रधानांनी दिला होता पुरस्कार

कारगिल : भारतीय लष्करातील जवानांसोबत कारगिल येथे सोमवारी दिवाळी साजरी करत असताना, एका प्रसंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. कारगिल येथे मेजर अमित या युवा अधिकाऱ्याने मोदी यांना २१ वर्षांपूर्वीचे एक छायाचित्र भेट दिले. हा अधिकारी विद्यार्थीदशेत सैनिकी शाळेत शिकत असताना त्याला व आणखी एका विद्यार्थ्याला मोदी यांनी पुरस्कार दिला होता.

मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या पुरस्कार सोहळ्याचे छायाचित्र पाहून मोदी जुन्या आठवणींमध्ये काही काळ रमले. गुजरातमधील बालाचडी येथील सैनिकी शाळेत मेजर अमित यांचे शालेय शिक्षण झाले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी त्या सैनिकी शाळेला भेट दिली होती. त्यावेळी अमित व आणखी एका मुलाला मोदींच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. अमित यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याचे ठरविले. आता ते मेजर पदावर कार्यरत आहेत. (वृत्तसंस्था)

मोदी व जवानांनी परस्परांना दिली मिठाईकारगिलमध्ये साजऱ्या केलेल्या दिवाळीत लष्करी जवान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परस्परांना मिठाई भरवली. मोदी यांनी कारगिलमधील जवानांपैकी काही जणांशी संवाद साधला. त्यांचे क्षेमकुशल विचारले. मोदी यांच्याशी झालेल्या संवादामुळे हे जवान भारावले होते.

जवानांसोबत नऊ वर्षे दिवाळी२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून ते दरवर्षी भारतीय लष्करातील जवानांबरोबर दिवाळी साजरी करतात. २०१४साली मोदी यांनी सियाचीनमध्ये लष्करी जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती.१९६५ साली पाकिस्तानसोबत  झालेल्या युद्धाला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मोदी यांनी दिवाळीत पंजाबमध्ये लष्करी जवानांच्या तीन स्मारकांना भेट देऊन वंदन केले होते.२०१६ हिमाचल प्रदेशात इंडो साली पंतप्रधान मोदी यांनी तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) या दलाच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर २०१७ साली काश्मीरमधील गुरेझ भागात, २०१८ साली उत्तराखंडमधील हरसिल येथील लष्करी छावणीला मोदी यांनी दिवाळीत भेट दिली होती.२०१९ साली नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील राजौरी, २०२० मध्ये लोंगेवाला, २०२१ ला नौशेरा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. यंदाच्या वर्षी त्यांनी कारगिलला भेट दिली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी