शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा

By admin | Updated: May 14, 2017 21:32 IST

हंदवाडा येथे जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं आहे.

ऑनलाइन लोकमत जम्मू-काश्मीर, दि. 14 - हंदवाडा येथे जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं आहे. हंदवाडाच्या वारीपोरा भागामध्ये लष्कर आणि दहशवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. वारीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिल्यानंतर जवानांनी दहशवाद्यांविरोधात शोधमोहीम राबवली होती. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांना शोधून त्यांचा कंठस्नान घालण्यात आलं आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू असतानाच अचानकपणे जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. जवानांच्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. हंदवाडाच्या जंगलात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यताही वर्तवण्यात आली असून, लष्करानं दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहीम तीव्र केली आहे. लष्करानं खात्मा केलेले दहशतवादी हे पाकिस्तानमधल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीदरम्यान दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रही हस्तगत करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी काश्मीरला लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना टार्गेट केल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. त्यामुळे काश्मीरमधल्या हंदवाडा परिसरात सुरक्षेचे कडे उभारण्यात आले आहेत.