शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ट्रक ड्रायव्हरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा लष्कराने २४ तासांच्या आत केला खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 17:34 IST

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना लक्ष्य करण्यात येत आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी अनंतनाग जिल्ह्यात एका ट्रक ड्रायव्हरची हत्या करणाऱ्या एका दहशतवाद्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी २४ तासांच्या आत कंठस्नान घातले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. सोमवारी रात्री अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी नारायण दत्त नावाच्या ट्रकचालकाची हत्या केली होती. आतापर्यंत दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात सहा ट्रक ड्रायव्हरांची हत्या केली आहे.  दरम्यान, काल हत्या झालेला ट्रक ड्रायव्हर नारायण दत्त याच्या घरी दु:खाचे वातावरण आहे. ''वडील हयात नाहीत, हे आम्हाला काल फोनवरून समजले. आम्ही चार भावंडे आहोत. तसेच आमची देखभाल करणारेही कुणी नाही,''असे नारायण दत्त यांच्या कन्येने सांगितले. ट्रक ड्रायव्हरची हत्या झाल्यानंतर पोलिस आणि सीआरपीएफने अनंतनागमध्ये सर्वत्र शोधमोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेदरम्यान बिजबेहरा येथे लष्कराच्या कचाट्यात सापडलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये एक दहशतवादी ठार झाला. मात्र त्याच्यासोबत असलेले इतर दहशतवादी फरार झाले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची ओळख पटवण्याचे काम लष्कराकडून सुरू आहे. तसेच परिसरात सर्च ऑपरेशनही सुरू आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान