शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सहा महिन्यात लष्कराने केला 80 दहशतवाद्यांचा खात्मा, अजूनही 115 दहशतवादी रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:00 IST

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलं आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लष्कराच्या अभियानाला यश मिळताना दिसत आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलं आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लष्कराच्या अभियानाला यश मिळताना दिसत आहे. लष्कराने गेल्या सहा महिन्यात 80 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या दक्षिण काश्मीरमध्येही अद्यापही 115 दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती लष्कराने दिली आहे. जवळपास 100 स्थानिक दहशतवादी असून, 15 परदेशी दहशतवादी दबा धरुन लपून बसलेले आहेत. 

गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. पम्पोरजवळील गावात झालेल्या या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचं नाव बदर होतं. तो जैश-ए-मोहम्मदचा सदस्य होता. जनरल ऑफिस कमांडिगने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने गेल्या सहा महिन्यात 80 दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊटअंतर्गत लष्कराने आपला मोर्चा दक्षिण काश्मीरच्या दिशेने वळवला असून, जिहादींचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा प्लान आखला आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियन जिल्हा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचं सांगितलं जातं. तिथे खुलेपणाने दहशतवादी कारवाया सुरु असतात. लष्कराने याठिकाणीही आपली गस्त वाढवली आहे. लष्कराने नवे कॅम्प उभारले असून, सीआरपीएफच्या रिझर्व्ह बटालियनलादेखील तैनात केलं आहे. 

दुसरीकडे, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी सरकाने इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांना जम्मू काश्मीरमधील सर्व पक्षांशी सतत चर्चा करण्यासाठी नियुक्त केलं आहे. 

'पाकिस्तानवर गोळीबार करु नका, पण जर त्यांनी केला तर सोडू नका'भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली होती. तसंच पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. राजनाथ सिंह यांनी सांगितलं होतं की, 'भारतीय जवानांना पाकिस्तानवर गोळीबार न करण्याचा आदेश दिला आहे. मात्र जर त्यांनी गोळीबार केल्यास असंख्य गोळ्यांचा वर्षाव करत योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला आहे'. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी