शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळला! चार दहशतवादी ठार

By admin | Updated: June 7, 2017 19:53 IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराने उघडलेल्या मोहिमेस आज पुन्हा मोठे यश मिळाले आहे. आज कुपवाडा जिल्ह्यातील माछिल

ऑनलाइन लोकमत
 श्रीनगर, दि. 7 -  जम्मू आणि काश्मीरमध्ये  दहशतवाद्यांविरोधात लष्कराने उघडलेल्या मोहिमेस आज पुन्हा मोठे यश मिळाले आहे.  आज कुपवाडा जिल्ह्यातील माछिल विभागात लष्कराने घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणूण पाडला असून, या कारवाईत चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. आज संध्याकाळी लष्कराच्या अधिकाऱ्याने ही बातमी दिली असून, या भागात दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहीम सुरू आहे. 
श्रीनगर येथे लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ""काल रात्री दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषा पार करून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे गस्तीवरील जवानांनी पाहिले. त्यानंतर जवानांनी या दहशतवाद्यांविरोधात कारवाईस सुरुवात केली.  त्यानंतर दहशतवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या कारवाईत हे दहशतवादी मारले गेले.""  अधिक वाचा :  लष्कराच्या हाती मोठं यश, दहशतवादी दानिश अहमदचं आत्मसमर्पण,  
 
ठार मारण्यात आलेल्या दहशतलाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या दहशतवाद्यांकडे जीपीएस सिस्टीमही आढळली आहे. दरम्यान, या भागात लष्कराची शोधमोहीम सुरू आहे.  लष्कराने गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यात अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.  दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधल्या बंदीपोरामध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.