शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

पूरग्रस्त हैदराबादेत लष्कर तैनात

By admin | Updated: September 25, 2016 03:09 IST

मुसळधार पावसामुळे हैदराबाद आणि शेजारील रंगारेड्डी जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून मदतीसाठी लष्कराच्या चार तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या आहेत.

हैदराबाद : मुसळधार पावसामुळे हैदराबाद आणि शेजारील रंगारेड्डी जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून मदतीसाठी लष्कराच्या चार तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागाचा तेलंगणाच्या अन्य भागासोबतचा संपर्क तुटला आहे. हैदराबाद शहर जलमय झाले आहे. हैदराबादेतील बेगमपेट, निजामपेट आणि हकीमपेट या भागात तसेच रंगारेड्डीच्या अलवा भागात लष्कराकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती लष्कराच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. हैदराबाद महापालिकेत (जीएचएमसी) लष्कराने एक नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तेथून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी पहाटेच मनपा आयुक्त जनार्दन रेड्डी यांची भेट घेतली व तुकड्यांच्या सज्जतेची माहिती त्यांना दिली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निर्देशांनतर ६0 सदस्यीय राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) स्थापना करण्यात आली आहे. हे दल राखीव म्हणून तयार ठेवण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पूरस्थितीमुळे साथीचे आजार पसरणार नाहीत, याची आतापासून काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. (वृत्तसंस्था)संपर्कच तुटल्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हैदराबाद शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला असून, उरलेल्या शहरापासून त्याचा संपर्क तुटला आहे. या भागात महापालिका आणि काही स्वयंसेवी संस्था अन्न, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत.