शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सीमा रेषेवर दहशतवाद्यांशी लढणार रोबोट

By वैभव देसाई | Updated: August 11, 2017 22:41 IST

लष्करानंही एक जालीम उपाय शोधलाय. भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी नियंत्रण रेषेवर लवकरच रोबोट तैनात करणार आहे.

नवी दिल्ली, दि. 11 - गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलिकडून होणा-या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय जवान शहीद झालेत. दहशतवाद्यांसह पाकिस्तानी सैन्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यावर लष्करानंही एक जालीम उपाय शोधलाय. भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी नियंत्रण रेषेवर लवकरच रोबोट तैनात करणार आहे.स्वदेशी बनावटीचे हे रोबोट शत्रूवर मात करत लष्कराच्या तळांवर दारूगोळा पोहोचवण्यासही सक्षम असणार आहेत. लष्करानं पहिल्या टप्प्यात 544 रोबोट बनवण्याच्या दिलेल्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयानंही हिरवा कंदील दाखवला आहे. भारतीय नियंत्रण रेषांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या रोबोट मशिन खूप फायद्याच्या ठरणार आहेत, असं लष्करानं म्हटलं आहे. जंगल परिसर, शहरी भागांसह ग्रामीण भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर या रोबोटचा उपयोग करणार आहे. राष्ट्रीय रायफल्स किंवा लष्करी जवान ज्या भागात पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी या रोबोटचा वापर करून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येणार आहे. या रोबोटमध्ये 200 मीटरपर्यंत पाठत ठेवू शकतील, असे कॅमेरे बसवण्यात येणार असून, ट्रान्समिशन सिस्टमचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हे रोबोट वजनानं हलके आणि खडबडीत असणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या इंदोरने यातून मार्ग काढत एक भन्नाट कल्पना अंमलात आणली होती. इंदोरमध्ये चक्क रोबोट वाहतुकीचं नियंत्रण करत असल्याचंही पाहायला मिळालं होतं, यासाठी वाहतूक पोलिसांनी एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजशी मदत घेतली होती. पहिल्यांदाच शहरात अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. शहरातील व्यस्त ठिकाण असलेल्या रस्त्यावर 14 फुटांचा धातूपासून तयार करण्यात आलेला रोबोट उभारण्यात आलेला आहे. हा रोबोट वाहतुकीवर लक्ष ठेवत असून नियंत्रण करत आहे. वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दोन प्राध्यापकांनी हा रोबोट तयार केला होता. राहुल तिवारी आणि अनिरुद्ध शर्मा यांनी हा रोबोट तयार केला असून यासाठी तब्बल दोन वर्ष लागली. या प्रोजेक्टसाठी एकूण 15 लाखांचा खर्च आला होता.