शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ड्रोनपर्व! भारतीय लष्कराने प्रथमच दाखवली ड्रोनशक्ती, चीन-पाकिस्तानची उडणार दाणादाण

By बाळकृष्ण परब | Updated: January 15, 2021 16:08 IST

Army Day parade 2021 News : भारतीय लष्कराने आज प्रथमच आपल्याकडे असलेल्या ड्रोनची क्षमता जगासमोर आणली.

ठळक मुद्देलष्कर दिनी झालेल्या संचलनावेळी अनेक ड्रोननी मिळून शत्रूचे टँक, दहशतवाद्यांचे तळ, हॅलिपॅट, फ्यूल स्टेशनसह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्याचे दाखवले प्रात्यक्षिक हे नवे तंत्रज्ञान भविष्यामध्ये युद्धाचे संपूर्ण चित्र बदलू शकतेनो कॉन्टॅक्ट वॉरफेअर म्हणजेच कुठल्याही कॉन्टॅक्टविना होणाऱ्या युद्धात हे हत्यार अत्यंत प्रभावी ठरेल

नवी दिल्ली - लष्कर दिनानिमित्त आज झालेल्या संचलनामध्ये लष्कराने शक्तिप्रदर्शन केले. यावेळी भारतीय लष्कराने प्रथमच आपल्याकडे असलेल्या ड्रोनची क्षमता जगासमोर आणली. हे ड्रोन कुठल्याही मानवी नियंत्रणाविना शत्रूच्या ठिकाणांना कशाप्रकारे लक्ष्य करू हे लष्कराने यावेळी दाखवून दिले. अनेक ड्रोन एकत्र मिळून एका मोहिमेला तडीस नेतात. या सिस्टिमला ड्रोन स्वॉर्मिंग असे म्हणतात. हे नवे तंत्रज्ञान भविष्यामध्ये युद्धाचे संपूर्ण चित्र बदलू शकते. नो कॉन्टॅक्ट वॉरफेअर म्हणजेच कुठल्याही कॉन्टॅक्टविना होणाऱ्या युद्धात हे हत्यार अत्यंत प्रभावी ठरेल.  

लष्कर दिनी झालेल्या संचलनावेळी अनेक ड्रोननी मिळून शत्रूचे टँक, दहशतवाद्यांचे तळ, हॅलिपॅट, फ्यूल स्टेशनसह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. यामध्ये एकूण ७५ ड्रोन सहभागी झाले होते. यामध्ये दाखवण्यात आले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे ड्रोन कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय शत्रूच्या प्रदेशातील ५० किमी आतपर्यंत गेले आणि लक्ष्य ओळखून ते उदध्वस्त केले. या सिस्टिममध्ये सर्व ड्रोन एकमेकांशी संपर्क साधत एकत्र मिळून मोहीम पूर्ण करतात.

भारतीय लष्कराने स्वदेशी कंपन्यांसोबत मिळून ड्रोन स्वॉर्मिंग प्रणालीचे प्रदर्शन केले. हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेल्या एका पावलाचे प्रतीक आहे. तसेच भविष्यात युद्ध कशा प्रकारे लढले जाईल याची झलक या माध्यमातून दाखवण्यात आली. आता अशा प्रकारचे तंत्रज्ञान हे जगभरातील युद्धाची पद्धत बदलत आहे.

आजच्या संचलनामध्ये मदर ड्रोन सिस्टिमसुद्धा दाखवण्यात आली. यामध्ये एका मदर ड्रोनमधून चार चाइल्ड ड्रोन बाहेर येतात. या ड्रोनचे लक्ष्य वेगवेगळे असते. हे चाइल्ड ड्रोन आपल्या लक्ष्याचा अचूकपणे भेद करतात.  

ऑफेंसिव्ह ड्रोन ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराने भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढे जात असल्याचे दाखवले. ड्रोन हे केवळ शत्रूच्या ठिकाण्यांना लक्ष्य करण्यासाठी नाही तर पॅरा ड्रॉपिंगसाठीही उपयोगात आणता येऊ शकतात. ड्रोनच्या माध्यमातून कुठलेही सामाना पॅराशूटमधून ड्रॉप करण्याबरोबरच हे ड्रोन सामान घेऊ स्वत:ही उतरू शकतात. तसेच लँड झाल्यानंतर यांची सिस्टीम आपोआप बंद होऊ शकते.  

तिथे असलेले सैनिक आलेले सामान घेऊन दुसरे सामान त्या ड्रोनमध्ये भरू शकतो. त्यानंतर हे ड्रोन आपोआप सुरू होईल आणि आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचू शकते. भारतीय सैनिक अनेक अशा ठिकाणी तैनात आहेत. जिथे हवामान प्रतिकूल असते. अशा ठिकाणी हे ड्रोन उपयुक्त ठरू शकतात.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतdelhiदिल्ली