शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडीओ फुटेज प्रसिद्ध करण्यास लष्कराची संमती

By admin | Updated: October 5, 2016 10:13 IST

भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईबद्दल काही राजकारण्यांनी शंका उपस्थित केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईबद्दल काही राजकारण्यांनी शंका उपस्थित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने या हल्ल्याचे व्हिडीओ चित्रीकरण प्रसिद्ध करायला सरकारला हिरवा कंदिल दाखवला आहे. 
 
या सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडीओ चित्रीकरण प्रसिद्ध करण्यासंबंधी अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयावर सोपवला आहे. भारताने हे पुरावे प्रसिद्ध करावेत जेणेकरुन सर्जिकल स्ट्राइक न झाल्याचा जे दावा करत आहेत त्यांना सणसणीत चपराक बसेल असे एका वरिष्ठ लष्करी अधिका-यांने सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने सांगितले.
 
पाकिस्तानी लष्कराकडून या सर्जिकल स्ट्राइकचा दावा फेटाळण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे चित्रीकरण समोर येणे महत्वाचे असल्याचे या अधिका-याचे म्हणणे आहे. भारतातील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईक्सचे पुरावे देण्याची मागणी केली होती. अनेक बाबींचा विचार करुन व्हिडीओ फुटेज प्रसिद्ध करण्यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल. 
 
आणखी वाचा 
 
व्हिडीओ फुटेज सार्वजनिक झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव आणखी वाढेल का ? हा सुद्ध महत्वाचा मुद्दा आहे. नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन केलेली कारवाई परिणामकारक ठरल्याचे पुरसे पुरावे असल्याचे लष्करी अधिका-यांनी सांगितले. व्हिडीओ फुटेजसह फोटोग्राफ्सही उपलब्ध आहेत. या संपूर्ण कारवाई दरम्यान मानवरहित विमानकडूनही लक्ष ठेवण्यात येत होते. दहशतवादी तळांचे मोठे नुकसान झाल्याचे सबळ पुरावे सरकारकडे आहेत असे वरिष्ठ सरकारी अधिका-याने सांगितले.