शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावे', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 21:11 IST

Rajnath Singh : 'जगभरात अस्थिरता असूनही भारत शांत आहे, परंतु आपण सावध राहण्याची गरज आहे.'

Rajnath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. "भारत एक शांतताप्रिय देश आहे, पण शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी सज्ज असणे आवश्यक आहे," असे विधान राजनाथ सिंह यांनी केले. लखनौ येथील पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी सशस्त्र दलांचे राष्ट्रीय हित जपण्यासाठी आणि 'आत्मनिर्भर भारत'  संकल्पनेत अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमांडर्सच्या संयुक्त परिषदेत राजनाथ सिंह म्हणाले की, जगभरात अस्थिरता असूनही भारत शांत आहे, परंतु आपण सावध राहण्याची गरज आहे. यादरम्यान संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही सैन्यांमधील एकात्मता वाढवण्याच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. तसेच, सशस्त्र दलातील बदलांच्या अनुषंगाने संयुक्त लष्करी दृष्टीकोन विकसित करण्याच्या आणि भविष्यातील युद्धांमध्ये देशासमोरील आव्हानांसाठी तयारी करण्यावरही त्यांनी भर दिला. 

अनपेक्षित हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तयार राहारशिया-युक्रेन, इस्रायल-हमास संघर्ष आणि बांग्लादेशातील सध्याच्या अस्थिर परिस्थितीचा संदर्भ देत संरक्षणमंत्र्यांनी कमांडर्सना या घटनांचे विश्लेषण करण्यास सांगितले आहे. तसेच भविष्यात देशाला भेडसावणाऱ्या समस्या आणि अनपेक्षित हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती आणि या भागातील शांतता आणि स्थैर्याला आव्हान देणाऱ्या शेजारील देशांमध्ये घडणाऱ्या घटनांचा विचार करून सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने सखोल विश्लेषण करण्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली. 

सशस्त्र दलांना अधिक चांगली शस्त्रे द्याराजनाथ सिंह पुढे म्हणाले की, आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सध्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे मजबूत उपकरणे असणे आवश्यक आहे. आपल्याकडे सर्व प्रकारची व्यवस्था असावी. यादरम्यान संरक्षणमंत्र्यांनी कमांडर्सना सशस्त्र दलांच्या शस्त्रागारात पारंपारिक आणि आधुनिक युद्धसामग्रीचा समावेश करण्यास सांगितले. यादरम्यान त्यांनी लष्करी नेतृत्वाला डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवान