शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

खरंच तुम्ही जागरूक पालक आहात? मुलांची योग्य काळजी घेता?

By admin | Updated: June 14, 2017 18:02 IST

जागतिक अभ्यास सांगतो, भारतीय पालक मुलांची नीट काळजी घेत नाहीत.. - जरा पाहा तपासून स्वत:ला.

- मयूर पठाडेअनेक पालकांची तक्रार असते.. विशेषत: हे मूल जर तीन वर्षांच्या आतील असेल तर.. ‘आम्ही मुलाकडे इतकं लक्ष देतो, त्याला हवं ते खायला घालतो.. जेवणाची वेळही त्याची एकदाही चुकवत नाही.. तो भुकेला राहणार नाही याची काळजी घेतो.. पण तरीही आमचं मूल अ‍ॅक्टिव्ह नाही. त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत त्याची वाढ कमी आहे असं वाटतं, त्याच्या हालचाली तुलनेनं मंद वाटतात..’- तुमचीही अशीच तक्रार आहे? तुमचंही मूल अगदी अस्संच आहे, असं तुम्हाला वाटतं?तर मग नक्कीच समजा, त्याला मायक्रोन्युट्रिअंट डेफिशिअन्सी आहे. आणि ही काही फक्त तुमचीच समस्या नाही, भारतीय घराघरांत हेच चित्र आहे. युनिसेफनंही नुकतंच त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. भारतीय पालक आपल्या मुलांची नीट काळजी घेत नाहीत, असाच त्याचा मतितार्थ आहे. आपण काय करतो? आपलं मूल चांगलं गोबरं, गुबगुबित दिसावं यासाठी त्याला अगदी दे मार, चारी ठाव खाऊ घालत असतो. पण त्यात बऱ्याचदा फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सचाच समावेश असतो. मात्र यासोबतच ज्या सूक्ष्म घटकांची शरीराला आवश्यकता असते, त्याकडे मात्र बऱ्याच मातांचं आणि पालकांचं दुर्लक्षच होतं. कोणते आहेत हे घटक?लोह, झिंक, आयोडिन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १२, फोलेट.. इत्यादि अनेक मायक्रोन्युट्रिअंटची आपल्या मुलांच्या शरीरात कमतरताच असते आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना नंतरच्या आयुष्यात भोगावे लागतात. मायक्रोन्युट्रिअंटच्या कमतरतेमुळे निर्माण होणारे दोष

 

१- मुलांची पचनक्रिया कायम दुबळीच राहते.२- अ‍ॅनिमिया म्हणजे रक्तक्षयासारख्या विकारांना त्यांना सामोरं जावं लागू शकतं.३- लक्ष एकाग्र करण्याची त्यांची क्षमता तकलादूच राहते. ४- शारीरिक वाढ खुंटलेली राहते.५- मानसिक वाढीवरही परिणाम होतो.

 

‘लॅन्सेट‘ या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्येही यासंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल सांगतो, मुलांच्या वाढीत या मायक्रोन्युट्रिअंट्सचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. विशेषत: पहिल्या हजार दिवसांत, म्हणजेच साधारण तीन वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या वाढीत त्यांची भूमिका अनन्यसाधारण असते. या काळात जर मुलांना व्यवस्थित पोषक द्रव्ये मिळाली, तरच त्यांची वाढ योग्यरित्या होईल. ती खऱ्या अर्थानं ‘गुटगुटित‘ आणि हेल्दी असतील.- तुमचंही मूल तुम्हाला खरोखरच अशा पद्धतीनं गुटगुटित हवं असेल, तर या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावीच लागेल.