शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

नागरिकांवर अधिक कर लादणं हा सामाजिक अन्याय- सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 20:52 IST

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सरन्यायाधीशांचं महत्त्वपूर्ण विधान

नवी दिल्ली: सरकारकडून जनतेवर अधिक किंवा मनमानी कर लादला गेल्यास तो सामाजिक अन्याय ठरेल, असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सरन्यायाधीशांनी व्यक्त केलेलं हे मत महत्त्वाचं मानलं जात आहे. कर चोरी अपराध असून त्यामुळे इतरांवर अन्याय होतो, असंदेखील सरन्यायाधीश म्हणाले. कर योग्य प्रमाणात निश्चित करण्यात यावेत, हे सांगताना त्यांनी प्राचीन काळात लागू असलेल्या करांचं उदाहरण दिलं. इन्कम टॅक्स ट्रिब्यूनलच्या ७९व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी अर्थसंकल्प आणि कररचना यावर भाष्य केलं. एखादी मधमाशी ज्या पद्धतीनं फुलाला हानी न पोहोचवता, त्यातला मध गोळा करते, त्याचप्रकारे नागरिकांकडून कर आकारण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी व्यक्त केलेली ही अपेक्षा अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. न्यायव्यवस्थेचा भाग असलेल्या व्यक्ती सरकारच्या धोरणांवर भाष्य करणं सहसा टाळतात. त्यामुळेच सरन्यायाधीशांचं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. थेट कराशी संबंधित ३.४१ लाख खटले आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. तर ३१ मार्च २०१९ पर्यंत इन्कम टॅक्स ट्रिब्यूनलकडे ९२ हजार २०५ खटले प्रलंबित आहेत. कराशी संबंधित खटले लवकर निकाली निघाल्यानं करदात्यांना प्रोत्साहन मिळतं, असं बोबडे म्हणाले. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि सीईएटीएटीमध्ये प्रलंबित असलेल्या अप्रत्यक्ष करांशी संबंधित खटल्यांमध्ये गेल्या दोन वर्षांत ६१ टक्क्यांनी घट झाली आहे. ३० जून २०१७ रोजी देशातल्या न्यायालयांमध्ये २ लाख ७३ हजार ५९१ खटले प्रलंबित होते. ३१ मार्च २०१९ रोजी हा आकडा १ लाख ५ हजार ७५६ वर आला. 

टॅग्स :budget 2020बजेट