शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठ हायस्पीड प्रकल्पांना मंजुरी; ३० किमी लांबीच्या नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 08:50 IST

आठ मार्गिकांचा असलेला नाशिक फाटा-खेड हा हायस्पीड कॉरिडॉर बांधा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसार साकारण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशभरात आठ हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रॉजेक्टना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यांची लांबी ९३६ किमी असून, त्यांच्या बांधणीसाठी ५० हजार ६५५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामध्ये आठ मार्गिकांचा व ३० किमी लांबीचा इलेव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉर या प्रकल्पाचा समावेश आहे. 

आठ मार्गिकांचा असलेला नाशिक फाटा-खेड हा हायस्पीड कॉरिडॉर बांधा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वानुसार साकारण्यात येणार असून, त्यासाठी ७,८२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग-६०वर पुणे व नाशिकमध्ये हा इलेव्हेटेड कॉरिडॉर चाकण, भोसरी इत्यादी ठिकाणांहून येणाऱ्या किंवा तिथे जाणाऱ्या वाहनांसाठी सुखकर मार्ग होणार आहे.  पिंपरी-चिंचवड येथे होणारी वाहतूक कोंडीदेखील या कॉरिडॉरमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. नाशिक फाटा ते खेड या दोन्ही बाजूंच्या दोन लेन सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे ४/६ लेनमध्ये रूपांतरित करण्यात येईल. 

विकासाला मिळेल चालना : पंतप्रधान

आठ हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना दिलेली मंजुरी ही भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना व महत्त्वाचे परिवर्तन करणारी ठरणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आर्थिक विकास वेगाने होईल, रोजगाराच्या संधी वाढतील, असेही मोदी म्हणाले.

महाराष्ट्राला आणखी एक भेट : फडणवीस

या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर होणार आहेच, पण या विभागातील औद्योगिक विकासालाही वेगाने चालना मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत विकासासाठी दिलेली आणखी एक भेट आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार