शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

आपचे लोकसभेचे उमेदवार ठरले; दिल्ली, हरयाणाच्या नावांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 06:14 IST

सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून मालवीयनगरचे आमदार सोमनाथ भारती आम आदमी पार्टीचे उमेदवार असतील.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील आम आदमी पार्टीने आज दिल्ली, हरयाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व पाचही जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात तीन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा समावेश आहे.पूर्व दिल्ली या खुल्या लोकसभा मतदारसंघातून ‘आप’ने जातीय राजकारणाला छेद देण्यासाठी दलित समाजाचे उमेदवार आमदार कुलदीप कुमार यांची उमेदवारी जाहीर केली. 

सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून मालवीयनगरचे आमदार सोमनाथ भारती आम आदमी पार्टीचे उमेदवार असतील. दक्षिण दिल्ली मतदारसंघामध्ये पक्षाने तुघलकाबादचे तीनवेळाचे आमदार सहीराम पहेलवान यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम दिल्लीतून माजी खासदार महाबल मिश्रा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, 

सातव्यांदा गुंगारा, पुन्हा ईडीची नोटीसदिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात यापूर्वीच्या सर्व सातही समन्सना गुंगारा देणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज ईडीने आठवा समन्स बजावला. ताज्या समन्सनुसार केजरीवाल यांना ४ मार्च रोजी ईडीपुढे चौकशीसाठी हजर राहायचे आहे.केजरीवाल यांच्या असहकाराच्या पवित्र्याला शह देण्यासाठी ईडीने चालू महिन्यात त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. पण राऊज ॲव्हेन्यू न्यायालयानेही केजरीवाल यांना १६ मार्च रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने समन्स बजावताना आपल्याला नेमक्या कोणत्या कारणासाठी चौकशीला बोलावले आहे हे स्पष्ट केल्यास आपण चौकशीला सहकार्य करू, अशी भूमिका केजरीवाल यांनी घेतली होती. पण आता न्यायालयानेच १६ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे.

नोटीस या तारखांना२ नोव्हेंबर, २१ डिसेंबर, ३, १७ आणि ३१ जानेवारी, १९ आणि २६ फेब्रुवारी

टॅग्स :AAPआप