शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

खुनात जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
नरेंद्र पिंपळीकर खून प्रकरण
नागपूर : बेसा रेवतीनगर येथील नरेंद्र पिंपळीकर याच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
वीरेंद्र ऊर्फ वीरू भोलेनाथ फटिंग (३०) असे आरोपीचे नाव असून, तो मानेवाडा रोड लवकुशनगर येथील रहिवासी आहे. वीरेंद्र हा कुख्यात गुन्हेगार अनिल ऊर्फ अण्णा राऊत याचा ड्रायव्हर आहे.
२५ जानेवारी रोजी नरेंद्र पिंपळीकर हा आपल्या घरी स्वत:चा वाढदिवस साजरा करीत असताना रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास वीरेंद्रसह पाच जणांनी एमएच-३१-ईए-५१५१ क्रमांकाच्या टोयोटा फॉर्च्युनरमध्ये त्याला बसवून अपहरण केले होते. त्याला पिपळा मार्गाने नेऊन आरोपींपैकी सूरज ऊर्फ कांची प्रकाश गायगवळी याने त्याच्या छातीवर शस्त्राने वार केला होता. त्यानंतर घाबरून त्याला मेडिकल कॉलेज इस्पितळात नेऊन स्ट्रेचरवर ठेवून सर्व आरोपी पसार झाले होते.
वीरेंद्र फटिंग याचा गाडीमालक अनिल राऊत याने मांगीलाल सुतार याच्याकडून स्वस्त दरात बाभूळखेड्याच्या इंद्रप्रस्थनगर येथील २५६८ चौरस फुटाचा १३० क्रमांकाचा भूखंड घटनेच्या दीड महिन्यापूर्वी नऊ लाख रुपयात विकत घेतला होता. मांगीलाल याने सक्करदऱ्याच्या उपनिबंधक कार्यालयातून आममुख्त्यारपत्र तयार करून दिले होते. मांगीलालने दलालीचे ५० हजार रुपये संजय गवईला दिले होते. गवई याने या दलालीतील १० हजार रुपये फटिंगला आणि १३ हजार रुपये गोलूला दिले होते.
वस्तुत: हा भूखंड मोरेश्वर खातखेडे यांचा होता. बनावट दस्तऐवजावर तो मांगीलाल आणि नरेंद्र पिंपळीकर यांनी विजय नरडकर आणि अनिल राऊत यांना विकला होता. ही बनबाबनवी लक्षात आल्यानंतर मांगीलाल याचा आरोपींनी बराच शोध घेऊन त्याला पकडले होते आणि अनिल राऊतच्या कार्यालयात हजर केले होते. घटनेच्या दिवशी त्यानेच आरोपींना पिंपळीकर याच्या घरी नेले होते. मांगीलाल हा या गुन्ह्यात फरार आहे. वीरेंद्र फटिंगने जामीन अर्ज दाखल करताच सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर यांनी आपल्या युक्तिवादात जामिनास जोरदार विरोध केला. आरोपी जामिनावर सुटल्यास साक्षीदारांवर दबाव आणून त्यांना फितवेल आणि तपासात अडथळा निर्माण होईल, असे सरकारचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.