शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

तिकिटावरील सबसिडी सोडण्यासाठी रेल्वे करणार आवाहन

By admin | Updated: July 6, 2017 18:36 IST

धर्तीवर रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडण्याचं प्रवाशांना आवाहन करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - गेल्या काही दिवसांपूर्वीच स्वयंपाक गॅसवरील सबसिडी सोडण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं होतं. आता त्याच धर्तीवर रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडण्याचं प्रवाशांना आवाहन करण्यात येणार आहे. मात्र स्वयंपाकाच्या गॅससारखेच रेल्वे तिकिटावरील सबसिडी सोडणं हे प्रवाशांसाठी ऐच्छिक असणार आहे, असंही रेल्वेनं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. पुढच्या महिन्यापासून रेल्वेकडून नवी योजना लागू केली जाणार असून, योजनेंतर्गत 50 टक्के आणि 100 टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये प्रवाशांना सबसिडी सोडता येणार आहे. रेल्वेला होणारी नुकसानभरपाई भरून निघावी, यासाठीच रेल्वेकडून असं आवाहन करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेला सद्यस्थितीत हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. प्रवाशांनी ऑनलाइन आणि रेल्वे तिकीट खिडकीवरून बुकिंग करणाऱ्या तिकिटांवरील सबसिडी सोडल्यास रेल्वेला त्याचा फायदा होणार आहे. मोदींच्या डिजिटल इंडिया या योजनेला डोळ्यांसमोर ठेवून रेल्वे प्रशासन हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणेच रेल्वेचा तोटा भरून काढण्यासाठी डायनामिक फेअर पद्धत अवलंब केला जाणार आहे. राजधानी, शताब्दी या रेल्वे गाड्यांमध्ये आधीपासूनच डायनामिक फेअर पद्धत लागू करण्यात आली आहे.

आणखी वाचा(पश्चिम रेल्वेवरील प्रवास होणार सुसाट)(ऑनलाइन रेल्वे तिकीट महागण्याची शक्यता)ऑनलाइन रेल्वे तिकीट महाग होण्याची शक्यता आहे. इंडियन रेल्वेने अर्थमंत्रालयाकडे त्या संदर्भातील मागणी केली आहे. ऑनलाइन रेल्वे तिकीटांवर पुन्हा एकदा सर्व्हिस चार्ज लावण्याची मागणी इंडियन रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगवर आधीच अनेक पद्धतीने सूट दिली जाते आहे म्हणूनच रेल्वे तिकिटांवर देण्यात येत असलेली सर्व्हिस चार्जची सूट 30 जून नंतर स्थगित केली आहे. अर्थ मंत्रालयाकडून रेल्वेची ही मागणी स्वीकारली गेली तर ऑनलाइन तिकीट बूक करताना प्रवाशांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागू शकतो. 

यामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर एसी बोगीच्या तिकीटावरील सर्व्हिस टॅक्समध्ये आर्ध्या टक्क्यांनी वाढ केली आहे. सध्या एसी क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 4.5 टक्के टॅक्स भरावा लागतो. जीएसटी लागू झाल्यानंतर हा टॅक्स 5 टक्के होईल. 
विशेष म्हणजे रेल्वे बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाइन रेल्वे तिकिटांवर सर्व्हिस टॅक्स रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्व्हिस टॅक्स कधीपर्यंत रद्द केला जाणार आहे यासंदर्भातील माहिती जेटलींनी दिली नव्हती. 
याआधी रेल्वे प्रवास सुरक्षेच्या कारणास्तव महाग होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली गेली होती. रेल्वे प्रवाशांवर सेफ्टी सेस लावण्याचा विचार केला जातो आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे सेफ्टी फंडासाठी योगदान देण्याचं आवाहन प्रवाशांना केलं होतं. पाच वर्षापूर्वी रेल्वे सेफ्टीसाठी एक लाख करोड देण्याचा निर्णय झाला होता.