शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दोन शेतकरी बाजारांचा प्रस्ताव मनपास आवाहन : जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

जळगाव : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संचालक मंडळाने राज्यात सर्व शहरांमध्ये शेतकरी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून जळगाव शहरात दोन शेतकरी बाजारांचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मनपाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मंडळातर्फे मनपास करण्यात आली आहे.

जळगाव : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संचालक मंडळाने राज्यात सर्व शहरांमध्ये शेतकरी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून जळगाव शहरात दोन शेतकरी बाजारांचा प्रस्ताव आहे. त्यासाठी मनपाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मंडळातर्फे मनपास करण्यात आली आहे.
राज्य कृषि पणन मंडळाच्या संचालक मंडळाने राज्यात १०० शेतकरी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत पुणे शहरात २०, नागपूरमध्ये २, मुंबईमध्ये १ शेतकरी बाजार सुरू करण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद शहरात २ शेतकरी बाजार सुरू करण्याची कार्यवाही अंतीम टप्प्यात आहे. कृषि पणन मंडळाने जळगाव शहरातही दोन शेतकरी बाजार सुरू करण्यासाठी मनपाने प्रमुख लोकवस्तीत सुमारे पाऊण ते १ एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
-------
मंडळ देणार शेतकर्‍यांना मदत
या शेतकरी बाजारात शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी संस्थांनी यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना योग्य दरात विक्री केली जाणार आहे. त्यासाठी शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना टेन्ट, ईलेक्ट्रॉनिक काटे, प्लास्टिक क्रेटस् आदी अर्थसहाय्य मंडळाकडून देण्यात येणार आहे.