शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

अमिताभ संपविणार रेल्वे अनारक्षित तिकिटांच्या रांगा, तिकीट खरेदीसाठी अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 04:07 IST

अमिताभ बच्चन यांचा ‘कालिया’हा गाजलेला चित्रपट आहे. यात बिग बींचा एक सदाबहार डायलॉग आहे. ‘हम जहा खडे होते है,वहीसे लाईन शुरु होती है’. लवकरच रेल्वेत सुद्धा हा डायलॉग ऐकायला मिळणार

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - अमिताभ बच्चन यांचा ‘कालिया’हा गाजलेला चित्रपट आहे. यात बिग बींचा एक सदाबहार डायलॉग आहे. ‘हम जहा खडे होते है,वहीसे लाईन शुरु होती है’. लवकरच रेल्वेत सुद्धा हा डायलॉग ऐकायला मिळणार असून लोकांना बच्चनप्रमाणेच रांगेत उभे न राहता अनारक्षित-यूटीएस तिकीट खरेदीचे आवाहन करण्यात येईल.रेल्वे स्थानकांवरील अनारक्षित तिकिटांसाठीच्या रांगा संपविण्यासाठी रेल्वेकडून अशाप्रकारचे इतरही काही संवाद आणि व्हिडिओ जारी केले जाणार आहेत. रेल्वेने यूटीएस अथवा अनारक्षित तिकीट देशभरात अ‍ॅपच्या माध्यमाने देणे सुरू केले आहे. आणि नोव्हेंबरपासून इंटरझोन अनारक्षित तिकीट अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देणे सुरू केल्यापासून दर दिवसाला जवळपास ८० हजार तिकिटांची विक्री अ‍ॅपद्वारे होते आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत सुमारे दीड लाखावर तिकिटे यूटीएस अ‍ॅपने विकल्या जातील,अशी अपेक्षा आहे. यामुळे स्थानकांवर तिकीट खिडक्यांपुढील रांगा कमी करण्यास निश्चितच मदत मिळेल.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या आदेशानुसार लोकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या अ‍ॅपवर प्रारंभी केवळ एका झोनमध्येच प्रवासाचे तिकीट दिले जात होते. परंतु १ नोव्हेंबरपासून यावर इंटरझोन अनारक्षित तिकीटही मिळत आहे. कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या पाच किमी अंतरापर्यंत या अ‍ॅपवर तिकीट खरेदी केले जाऊ शकते. ग्रामीण, शहर,गाव,खेड्याच्या प्रत्येक स्टेशनवर ते कार्यरत आहे.अमिताभ आणि इतर सिनेकलावंत, नामांकित लोक संदेशाद्वारे यूटीएसचा लाभ सांगतील तेव्हा लोक तासन्तास रांगेत उभे राहण्याऐवजी आपल्या मोबाईलवर अ‍ॅपच्या माध्यमाने अनारक्षित तिकीट खरेदीस प्राधान्य देतील,अशी आशा रेल्वेला आहे. यासोबतच लोकांना एका क्लिकवर तिकीट देण्याचे गोयल यांचे उद्दिष्टही साध्य होईल. लोक अ‍ॅपवर तिकीट खरेदी करून थेट गाडीत बसू शकतील.सर्वाधिक खरेदी मुंबईतएका अधिकाऱ्याने सांगितले की, अ‍ॅपवरील तिकिटाचे प्रिंटही काढण्याची सुविधा आहे. प्रवास केला नाहीतर हे तिकीट रद्दही केले जाऊ शकते. संपूर्ण किराया प्रवाशांच्या अकाऊंटमध्ये परत जाईल. मुंबईस्थित मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे क्षेत्रात अ‍ॅपद्वारे तिकीट खरेदी करणाºयांच्या सर्वाधिक संख्या आहे. तिसºया आणि चौथ्या क्रमांकावर कोलकात्यातील ईस्टर्न रेल्वे आणि चेन्नईचे दक्षिण रेल्वे आहे. तर साऊथ सेंट्रल रेल्वे पाचव्या क्रमांकावर आहे. या अ‍ॅपद्वारे दररोज ८० हजार तिकिटे विकल्या जात असून याद्वारे रेल्वेला ४५ लाख रुपयांवर उत्पन्न मिळत आहे. जवळपास साडेचार लाख प्रवासी या तिकिटांवर प्रवास करीत आहेत.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनIndian Railwayभारतीय रेल्वे