शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

अॅपलकडून iPhone 7 आणि iPhone 7 Plusचे स्पेशल एडिशन लाँच (फोटो स्टोरी)

By admin | Updated: March 22, 2017 13:52 IST

टेक्नॉलॉजीमध्ये आघाडीची कंपनी असलेल्या अॅपलनं iPhone 7 आणि iPhone 7 Plusचे स्पेशल एडिशन लाँच केले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - टेक्नॉलॉजीमध्ये आघाडीची कंपनी असलेल्या अॅपलनं iPhone 7 आणि iPhone 7 Plusचे स्पेशल एडिशन लाँच केले आहेत. अॅपलचे हे आयफोन लूकला एकदम भारी आहेत. अॅपलच्या या आयफोनचे रेड कलरमध्ये स्पेशल एडिशन उपलब्ध आहे. 
नव्या iPhone 7 आणि iPhone 7 Plusची बॉडी ही अॅल्युमिनियमयुक्त आहे. या आयफोनची विक्री 24 मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र दोन्ही फोनच्या फीचर्समध्ये काहीच बदल करण्यात आला नाही. दोन्ही आयफोन हे जवळपास सारखेच आहेत. विशेष म्हणजे अॅपलच्या iPhone 7 Plus रेड कलरमध्ये स्पेशल एडिशनची किंमत 82 हजारांच्या घरात राहणार आहे. कंपनीनं अद्यापही iPhone 7 ची किंमत जाहीर केलेली नाही. iPhone 7 आणि iPhone 7 Plus हे जगभरातल्या अॅपलच्या अधिकृत पुनर्विक्रेत्यांकडे उपलब्ध असतील. तसेच आयफोन 7 ब्लॅक, सिल्व्हर, गोल्ड आणि रोज रेड कलरमध्येही उपलब्ध असेल. या आयफोनमध्ये वापरकर्त्यांसाठी अनुकूल सॉफ्टवेअर देण्यात आले असून, टॅक्स कपातीसंदर्भातही या आयफोनवर मार्गदर्शन मिळणार आहे.
अॅपलचे iPhone 7 आणि iPhone 7 Plus हे दोन्ही स्पेशल एडिशन भारतात एप्रिलच्या दुस-या आठवड्यात लाँच होणार आहेत. मात्र 24 मार्चपासून हे आयफोन्स अमेरिकेसह 40 देशांमध्ये उपलब्ध होणार आहेत. यात ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, इटली, जपान, मॅक्सिको, नेदरलँड, न्यूझीलंड, रशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तैवान, थायलंड, इंग्लंड, अरब आमिरातीतील देशांचा समावेश आहे.अॅपलनं iPhone 7 आणि iPhone 7 Plusचे स्पेशल एडिशन हे एड्ससाठी पैसे जमा करण्याच्या कॅम्पेनचा एक भाग आहे. त्याअंतर्गत अॅपल रेड थीमचे प्रोडक्टस आणि अॅप बनवणार आहे. या आयफोनच्या दोन्ही मॉडेलची मेमरी अनुक्रमे 128 जीबी आणि 256 जीबी असणार आहे. अॅपलचे सीईओ टीम कूक म्हणाले, हा रेड एडिशनचा स्पेशल आयफोन 7 लाल रंगासोबतची पार्टनरशिप आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लाँच करण्यात आला आहे. लवकरच आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहोत. तसेच कंपनीनं आयफोन एसईच्या मेमरीही वाढवली आहे. पहिल्यांदा 16 जीबी आणि 64 जीबीपर्यंत मिळणारे आयफोन आता 32 जीबी आणि 128 जीबीपर्यंत उपलब्ध आहेत.  आयफोन 7 मध्ये 4.7 इंच डिस्प्ले बसवण्यात आला आहे. ज्याचं रिझॉल्युशन 1334 X 750 आहे. त्यामध्ये 1920X1080 पिक्सल रिझॉल्युशन देण्यात आलं आहे.
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमधला नव्या लाल रंगातील स्पेशल एडिशनचा हँडसेट फक्त 128 आणि 256 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत 48 हजारांपासून सुरू होते.
या लाल रंगाच्या आयफोनची प्री-ऑर्डर बुकिंग 24 मार्चला भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहे. आईफोन 7 प्लसमध्ये 128 जीबीच्या मोबाईलची किंमत 56 हजारांएवढी असणार आहे. तर 256 जीबीच्या मॉडलची किंमत 63 हजारांपर्यंत असणार आहे.