शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
2
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
3
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
4
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
6
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
7
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
8
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
9
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
10
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
11
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
12
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
13
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
14
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
15
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
16
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
17
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
18
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
19
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
20
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)

CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:04 IST

Government Job: गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीमध्ये करिअर करायची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडीमध्ये करिअर करायची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच होमगार्ड पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली. या भरतीसाठी १ मे २०२५ पासून भरती प्रकिया सुरु झाली असून १५ मे २०२५ अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असेल.  यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज वेळेवर विहित पत्यावर पाठवावेत. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

शैक्षणिक पात्रतागुन्हे अन्वेषण विभागाद्वारे जाहीर केलेल्या होमगार्डच्या पदांसाठी इच्छुक असलेला उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  याशिवाय, उमेदवाराला संगणक चालवण्याचे ज्ञान असणे गरजेच आहे. तसेच उमेदवार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे अनिवार्य आहे.

वयअर्ज करण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे ठेवण्यात आली आहे, जी १ मे २०२५ च्या आधारावर मोजली जाईल. या पदासाठी पुरुषांसह महिला देखील अर्ज करू शकतात.  पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची १६० सेमी आणि महिला उमेदवारांसाठी १५० सेमी निश्चित करण्यात आली. 

आवश्यक कागदपत्रेया भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रेही जोडावी लागतील. उमेदवाराला अर्जासह दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका, इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे, निवास आणि जातीचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, संगणक प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो पाठवावी लागतील. ही सर्व कागदपत्रे अर्जासह योग्य क्रमाने शेवटच्या तारखेअगोदर विहित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रियाया भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या लेखी परीक्षेला बसण्याची आवश्यकता नाही. सर्वात प्रथम उमेदवारांचे अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. याशिवाय, उमेदवारांची शारीरिक मापन आणि कौशल्य चाचणी केली जाईल.

पगारनिवडलेल्या उमेदवारांना प्रतिदिन ७१० रुपये दराने वेतन मिळेल. ही भरती केवळ आंध्र प्रदेश सीआयडीसाठी केली जात आहे, ज्यामध्ये इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज संबंधित कागदपत्रांसह स्पीड पोस्टद्वारे विहित पत्त्यावर पाठवावे लागेल.

टॅग्स :jobनोकरी