शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अनुपम खेर झाला उपहासाचा विषय

By admin | Updated: February 1, 2016 01:08 IST

बॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. माणसाला आपल्या शब्दांत कसा शब्दच्छळ करावा लागतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे अनुपम खेर. याची दोन कारणे आहेत.

लोकमत स्पेशल, अनुज अलंकारबॉलीवूडमधील अभिनेते अनुपम खेर सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. माणसाला आपल्या शब्दांत कसा शब्दच्छळ करावा लागतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे अनुपम खेर. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे आहे की, मोदी सरकारने त्यांना पद्मभूषण दिले असून, दुसरे कारण हे आहे की, काही वर्षांपूर्वी याच अनुपम खेर यांनी या पुरस्कारांना ‘सरकारची चमचेगिरी’ या शब्दांत संबोधले होते. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनुपम खेर यांचे दोन टिष्ट्वट गाजत आहेत. एका टिष्ट्वटमध्ये ते या पुरस्कारावर टीका करीत असून, दुसऱ्या टिष्ट्वटमध्ये ते मोदी सरकारकडून मिळालेला पद्म पुरस्कार आपल्या जीवनातील सर्वात आनंदी दिवस असे संबोधून स्वत:ला धन्य मानत आहेत. अनुपम खेर यांच्याशिवाय मधुर भांडारकर आणि उत्तर प्रदेशच्या लोकगायिका मालिनी अवस्थी यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. अनुपम खेर यांच्यासह या दोघांनी असहिष्णुतेच्या प्रकरणी सरकारच्या बाजूने बिगुल वाजविला होता आणि दिल्लीत एक रॅलीही काढली होती. हे तिघेही मोदी सरकारच्या जवळचे असल्याने त्यांना हे पुरस्कार मिळाले यात संशय नाही. त्याचमुळे या तिघांवर सोशल मीडियातून टीकाटिप्पणीला सामोरे जावे लागत आहे.त्यातही अनुपम खेर सर्वात जास्त चर्चेत आहेत. ही बाब त्यांना पद्म पुरस्कार मिळाला म्हणून नव्हे, तर एकेकाळी ते स्वत:ला गैरराजकीय व्यक्ती समजत होते.चित्रपट क्षेत्रात त्यांनी शानदार यश मिळविले आहे. मात्र, आता त्यांची दररोजची राजकीय वक्तव्ये पाहता एके दिवशी ते भाजपाचे अधिकृत सदस्य बनल्यास आश्चर्य वाटावयास नको. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपा त्यांना सिमला येथून उमेदवारी देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. कदाचित त्यांना राज्यसभेवर घेतले जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनुपम खेर राजकारणात सामील होणे ही काही चूक नाही. त्यांना तो नागरी अधिकार आहे. त्याबद्दल कोणी सवालही उपस्थित करू शकत नाही. आणखी ते राजकीय नेते बनलेले नाहीत; पण राजकारणाच्या दलदलीत ते आपल्या विश्वासार्हतेला डाग लावून घेतील काय, असा सवाल निर्माण झाला आहे. येणारा काळच त्याचे उत्तर देईल. आता ते काहीही बोलले तरी ती बातमी होईल आणि सोशल मीडियावर चांगल्या-वाईट प्रतिक्रिया येतील हे मात्र निश्चित.