शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शीखविरोधी दंगलीचे खटले पुन्हा नव्याने !

By admin | Updated: June 13, 2016 06:21 IST

एसआयटीने इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीशी संबंधित ७५ खटले पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- पंजाबमधे आगामी विधानसभेचा निवडणूक ज्वर एकीकडे वाढत असताना केंद्र सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीशी संबंधित ७५ खटले पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येनंतर शीख समुदायाविरुद्ध भडकलेल्या दंगलीत देशात ३,000 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. एकट्या दिल्लीतच २,७३३ लोक ठार झाले होते. शीखविरोधी दंगलीच्या आरोपावरून ५८७ गुन्हे नोंदवले गेले. यापैकी २४१ गुन्हे ज्यांच्या विरोधात घडले ते फिर्यादी तक्रार करण्यासाठी अथवा साक्षीपुरावे सादर करण्यासाठी पुढे आले नाहीत. अंतत: या गुन्ह्यांचा तपास बंद करावा लागला. २00६ साली १ आणि २0१३ साली चार खटले पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले. त्यात ३५ आरोपींना शिक्षा झाली. तथापि २३५ गुन्ह्यांशी संबंधित खटले आजही फाइल बंद अवस्थेत आहेत. या प्रकरणांच्या समीक्षेनंतर केंद्र सरकारच्या एसआयटीने ७५ खटले पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खटल्यातील साक्षीदारांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे यासाठी एसआयटीतर्फे लवकरच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. काही खटल्यांच्या सार्वजनिक सुनावण्या करण्याचाही एसआयटीचा इरादा आहे.शीख समुदायविरोधी दंगलींच्या खटल्याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात नरेंद्र मोदींना एक पत्र पाठवले होते. १९८४ च्या दंगलीसंदर्भात एकाही खटल्याची सुनावणी नव्याने सुरू करण्यास केंद्र सरकारची एसआयटी असमर्थ ठरली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीच्या राज्य सरकारला एसआयटी नियुक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी केजरीवाल यांनी या पत्रात केली होती. त्यांच्या पत्राच्या आधारेच केंद्र सरकारच्या एसआयटीने ताजा निर्णय घेतला आहे, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.>अचानक निर्णयामागे पंजाब निवडणूककेंद्र सरकारच्या यंत्रणेमार्फत अचानक हा निर्णय घेतला जाण्यामागे पंजाब विधानसभेची आगामी निवडणूक हे मुख्य कारण असल्याची चर्चा आहे. पंजाबच्या अकाली दल सरकारमधे भाजपा मित्रपक्ष आहे. अँटी इनकम्बन्सीमुळे आगामी निवडणुकीत अकाली दल-भाजपा आघाडीची स्थिती फारशी चांगली नाही. उडता पंजाब चित्रपटाच्या गाजत असलेल्या ताज्या वादात केंद्रीय सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्हे लागल्याने मोदी सरकारवरही नामुष्की ओढवली आहे. पंजाबमधे खरी झुंज केजरीवालांचा ‘आप’ व काँग्रेस पक्षातच आहे, असे ताजे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व ‘आप’मध्ये वितुष्ट निर्माण व्हावे, पंजाबी अस्मितेला काँग्रेसच्या विरोधात पुन्हा फुंकर घालता यावी, या इराद्याने १९८४ च्या दंगलीच्या जखमा पुन्हा ओल्या करण्याचा हा प्रयत्न आहे, असे बोलले जाते.