शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

प्रादेशिक पक्षांची मोदीविरोधी आघाडी

By admin | Updated: November 7, 2014 04:54 IST

संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी ‘आघाडी’ उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत़

नवी दिल्ली : संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी ‘आघाडी’ उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत़ गुरुवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आयोजित ‘लंच डिप्लोमसी’ याच प्रयत्नांचा एक भाग मानला जात आहे़ विशेष म्हणजे, या प्रयत्नांना काँग्रेसचीही साथ मिळण्याची शक्यता असल्याने संसदेचे आगामी अधिवेशन मोदी सरकारची कसोटी पाहणारे ठरण्याची चिन्हे आहेत.मोदी सरकारला चहूबाजूंनी घेरण्यासाठी संसदेत सामायिक डावपेच तयार करण्याच्या योजनेंतर्गत मुलायम यांच्या निवासस्थानी गुरुवारी एका बैठकीचे आयोजन केले गेले़ राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव व त्यांच्या पत्नी राबडीदेवी, संयुक्त जनता दल अध्यक्ष शरद यादव, सेक्युलर जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा आणि इंडियन नॅशनल लोकदलचे दुष्यंत चौटाला आदींनी या बैठकीला हजेरी लावली़ ‘दुपार भोज’ असे निमित्त असले तरी संसदेत संयुक्त आघाडीची शक्यता पडताळून बघणे हाच या बैठकीचा हेतू होता. त्यानुसार संसदेत मोदी सरकारला घेरण्याच्या डावपेचांवर बैठकीत दीर्घ चर्चा झाली़ उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारया संयुक्त डावपेचांना काँग्रेसचेही पूर्ण पाठिंबा असेल़केवळ संसदेत सरकारला घेरण्यापुरतीच नाही तर सपा, राजद, जदयू आणि अन्य प्रादेशिक पक्षांची ही मोट एक नवी राजकीय आघाडी म्हणून समोर येऊ शकते, असे संकेत बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले आहेत़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसही नव्या राजकीय आघाडी स्थापनेस खतपाणी देत आहे़ काळ्या पैशाच्या मुद्यावर राजद, जदयू, सपा, आयएनएलडी सरकारवर हल्ला करतील़ याचवेळी काँग्रेस आणि डावे पक्षही आक्रमक होतील़ काळ्या पैशाशिवाय बेरोजगारीचा मुद्दाही संसदीय डावपेचांच्या अजेंड्यावर आहे़ हमी भाव देण्याच्या नावावर झालेल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा मुद्दाही काँग्रेससह सर्व पक्ष एका सुरात संसदेत उपस्थित करण्याच्या तयारीत आहेत़ राज्यसभेत महत्त्वपूर्ण विधेयके पारित करण्याचे सरकारचे प्रयत्न हाणून पाडण्याचेही या ‘संयुक्त आघाडी’चे प्रयत्न असणार आहेत़ दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदींना चहूबाजूंनी घेरून, ते ‘असत्याचे राजकारण’ करीत आहेत, हे सिद्ध करण्याचे या राजकीय विरोधकांचे प्रयत्न आहेत़ सूत्रांच्या मते, डावे पक्ष, ममता बॅनर्जी आणि जयललिता यांच्याहीही चर्चा सुरू असून भाजपा-काँग्रेसला एक सक्षम पर्याय उभा करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत़ मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न यातून साधले जाणार असल्याने काँग्रेसलाही हा प्रयोग रुचला आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)