शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विकासविरोधी दहशतवाद ही दोन्ही राष्ट्रांची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 07:03 IST

दिल्ली आणि गुजरातनंतर मुंबईत दाखल झालेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली

मुंबई : दिल्ली आणि गुजरातनंतर मुंबईत दाखल झालेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर बिझनेस समीटमध्ये सहभागी होत दहशतवाद ही भारत आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांची समस्या असल्याचे सांगितले. मात्र, आता परिस्थिती बदलली असून कोणत्याही दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी दोन्ही राष्ट्रे सज्ज असल्याचेही ते म्हणाले.हॉटेल ताज येथे आयोजित ‘भारत-इस्रायल उद्योग संमेलन-२०१८’मध्ये बेंजामिन नेतान्याहू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही देशांतील उद्योजक उपस्थित होते. इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमॉन यांनी प्रास्ताविक केले. या वेळी नेतान्याहू म्हणाले की, भारत आणि इस्रायलची फार जुनी मैत्री असून दोन्ही देशांना उज्ज्वल भविष्य आहे. इस्रायलमध्ये चांगले संशोधक, तंत्रज्ञ आहेत. विकासाभिमुख वातावरण आहे. दोन्ही देशांच्या उद्योगवाढीसाठी चांगल्या संधी आहेत. आता एकत्र काम करून विकास साधायचा आहे.गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळबिझनेस लीडर असलेल्या महाराष्ट्रात इस्रायलच्या उद्योगपतींनी उद्योग सुरू करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात केले. इस्रायलने केलेल्या कृषी क्रांतीचे जगभर कौतुक होत आहे. भारताने वेळोवेळी इस्रायली कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साधला आहे. उत्पादनवाढीसाठी होत असलेले विविध संशोधन आणि प्रयोग याचा फायदा कृषी उद्योगाला होत आहे.महाराष्ट्रात उद्योगवाढीस पोषक वातावरण आहे. देशातील अन्य राज्यांपेक्षा सर्वांत मोठी ५० टक्के आर्थिक गुंतवणूक या राज्यात झाली आहे. इस्रायलच्या उद्योजकांसाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ व संधी आहे. दहशतवादासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दोन्ही राष्ट्रे दहशतवादाविरुद्ध लढत आहेत. आता एकत्रपणे लढून दहशतवाद मोडून काढायचा आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू