नवी दिल्ली : माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळवणुकीचा आरोप करणाऱ्या माजी पत्रकार प्रिया रामाणींवर दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात तिघांची साक्ष शुक्रवारी नोंदविण्यात आली. याप्रकरणी आणखी काही जणांच्या साक्षी घेण्यात येतील. दिल्लीतील पतियळा हाऊस जिल्हा न्यायालयात हा खटला सुरू असून, त्याची पुढील सुनावणी ११ जानेवारी रोजी होईल. अकबर यांनी आपला लैंगिक छळ केला असल्याचा आरोप प्रिया रामाणी व आणखी काही महिला पत्रकारांनी केला होता. न्याय मिळण्यासाठी लढा देण्याचा निर्धार अकबर यांच्या बाजूने जॉयिता बसू या महिला पत्रकाराने १२ नोव्हेंबर रोजी साक्ष दिली आहे. प्रिया रामाणी यांनी अकबर यांची प्रतिमा डागाळण्यासाठी मुद्दामहून खोटे आरोप केल्याचा दावा बसू यांनी केला. अकबर यांच्या बाजूने सहा साक्षीदार आहेत. सत्य उजेडात येण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार प्रिया रामाणी यांनी केलाआहे.
अकबर बदनामी खटल्यात आणखी साक्षीदारांची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:26 IST