शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये आणखी एका संघ स्वयंसेवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 17:35 IST

केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची हत्या थांबण्याचे नाव घेत नाही. केरळमधील त्रिसूरच्या गुरुवायूर भागातील आनंदू या संघ स्वयंसेवकाची हत्या झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे.

ठळक मुद्देसंघ प्रचारकांना सुरक्षास्मृति ईराणी यांची टीकाकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली चिंता

तिरुअनंतपूरम : केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची हत्या थांबण्याचे नाव घेत नाही. केरळमधील त्रिसूरच्या गुरुवायूर भागातील आनंदू या संघ स्वयंसेवकाची हत्या झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे.केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील इडाक्कड भागात निधीश या स्वयंसेवकावर जीवघेण्या हल्ल्यानंतर आता आनंदू याच्यावर हल्ला करण्यात आला, त्यात आनंदू याचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी त्रिवंद्रम येथे काही गुंडांनी ३४ वर्षीय स्वयंसेवक राजेश याचा धारदार शस्त्राने हात कापला होता, त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली होती.जुलै महिन्यातही कन्नूर जिल्ह्यातील संघाच्या कार्यालयावर हल्ले झाले होते. त्यात काही ठिकाणी आग लावल्याचेही निष्पन्न झाले होते. भाजप आणि संघांशी संबंधित काही लोकांच्या दुकांनावरही स्फोट घडवून त्यांना आग लावण्यात आल्याचेही समोर आले होते. या सर्व घटनांची केंद्र सरकारने कडक शब्दात निर्भत्सना केली होती.दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आनंदूच्या हत्येमागे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असल्याचा आरोप केला आहे. आनंदू हा संघाचा स्वयंसेवक आहे आणि तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता फाजिल याच्या हत्येत सहआरोपी असल्याचा आरोप आहे.संघ प्रचारकांना सुरक्षाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर होणाºया हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संघ प्रचारकांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर संघाचे विभाग प्रचारक शशिधरण यांना गृह मंत्रालयाकडून सुरक्षा देण्यात आली होती.स्मृति ईराणी यांची टीकासंघ स्वयंसंवकांच्या हत्याविरोधात भाजपने १५ दिवसांची जनरक्षा यात्रा काढली होती. या यात्रेत सहभागी झालेल्या केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी राज्यातील डाव्या सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, केरळमधील डाव्या सरकारने केरळसारख्या सुंदर राज्याला राजकीय स्मशानभूमी बनविली आहे. त्या म्हणाल्या, की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला वाटते असेल, की असल्या हिंसेमुळे आम्ही घाबरु, पण भाजप घाबरणार नाही.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघkeralकेरळ