नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या आणखी एक आमदार भावना गौर त्यांच्या शैक्षणिक योग्यतेवरून कायद्याच्या कचाट्यात अडकल्या आहेत. दिल्लीतील एका न्यायालयाने त्यांच्या विरुद्धच्या याचिकेची दखल घेतली आहे. तक्रारीनुसार पालममधील आमदार असलेल्या गौर यांनी २०१३ च्या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बारावीपर्यंत शिक्षण झाले असल्याचे सांगितले होते, तर २०१५ च्या निवडणुकीत मात्र आपण बी.ए.,बी.एड. असल्याचे नमूद केले होते. केवळ १४ महिन्यांच्या कालावधीत पदवी कशी घेतली, असा सवाल आहे. (वृत्तसंस्था)
आणखी एक आमदार बोगस पदवी वादात
By admin | Updated: July 4, 2015 02:29 IST