नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी आजचा दिवस हा दुहेरी धक्का देणारा ठरला. आज दुपारी नाराज असलेले मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असतानाच संध्याकाळी आमदार मिहिर गोस्वामी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीमध्ये भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.टीएमसीचे नेते असलेले मिहीर गोस्वामी यांनी काही दिवस आधीच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पश्चिम बंगालमधील कुचबिहार विधानसभा मतदारसंघातील टीएमसीचे खासदार असलेले मिहीर गोस्वामी हे शुक्रवारी भाजपा खासदार निशित प्रामाणिक यांच्यासोबत नवी दिल्लीसाठी रवाना झाले होते. तेव्हापासूनच ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
ममतांना दिवसभरात दुसरा धक्का, तृणमूलला सोडचिठ्ठी देत आमदाराचा भाजपात प्रवेश
By बाळकृष्ण परब | Updated: November 27, 2020 20:22 IST
BJP News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी आजचा दिवस हा दुहेरी धक्का देणारा ठरला.
ममतांना दिवसभरात दुसरा धक्का, तृणमूलला सोडचिठ्ठी देत आमदाराचा भाजपात प्रवेश
ठळक मुद्देआमदार मिहिर गोस्वामी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केलाभाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीमध्ये भाजपाचे सदस्यत्व स्वीकारलेमिहीर गोस्वामी यांनी काही दिवस आधीच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची इच्छा व्यक्त केली होती