शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांची वार्षिक वसुली १०० कोटींची

By admin | Updated: June 23, 2014 04:35 IST

देशात नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव छत्तीसगड राज्यात आहे. माओवाद्यांना येथून मिळणारा भरमसाठ पैसा हे त्यामागील मुख्य कारण आहे.

रायपूर : देशात नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव छत्तीसगड राज्यात आहे. माओवाद्यांना येथून मिळणारा भरमसाठ पैसा हे त्यामागील मुख्य कारण आहे. विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माओवादी राज्यातून दरवर्षी सुमारे ८० ते १०० कोटी रुपये गोळा करतात. नक्षलग्रस्त राजनांदगाव जिल्ह्यातील सीतागाव आणि औंधीच्या जंगलात यावर्षी ४ मार्चला सुरक्षा दलांनी नक्षल्यांनी तयार केलेली एक भूमिगत तिजोरी जप्त केली. यात २९ लाख रुपये होते. पोलिसांकडून नक्षल्यांची एवढी रक्कम पकडण्याची ही पहिलीच घटना होती. नक्षलग्रस्त भागात अशा शेकडो भूमिगत तिजोऱ्या असून, यात नक्षली आपला पैसा लपवून ठेवत असतात. जमीन खोदून एक खड्डा तयार केला जातो व त्यात ही तिजोरी ठेवली जाते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, देशातील बडे नक्षली नेता या राज्यावर लक्ष ठेवून आहेत; कारण त्यांना येथून फार मोठी रक्कम मिळत असते. ही रक्कम वर्षाला ८० ते १०० कोटींपर्यंत जात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना विविध माध्यमांकडून मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता गुडसा उसेंडी ऊर्फ जीवीके प्रसाद यानेसुद्धा याला दुजोरा दिला आहे. नक्षली त्यांचा दबाव असलेल्या क्षेत्रातील सामान्य लोकांकडून तीन कोटी, व्यापाऱ्यांकडून १० कोटी, ठेकेदार २० कोटी, ट्रान्स्पोर्टर्स १० कोटी, तेंदूपत्ता ठेकेदार २० कोटी, बांबू आणि जंगल तोडणाऱ्यांकडून १५ कोटी, उद्योगपतींकडून २० कोटी तर या भागात कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून देणगीच्या रूपात जवळपास दोन कोटी रुपये वर्षाला वसूल करतात. नक्षल्यांकडून ही वसुली अत्यंत सावधपणे होत असते. तसेच ही रक्कम ठेवण्याची गुप्त ठिकाणेही प्रत्येक भागात फक्त दोघांना माहिती असतात. या पैशाचे नियोजनही फार काळजीपूर्वक केले जाते. (वृत्तसंस्था)