शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Anna Hazare-Arvind Kejriwal: 'मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हीही सत्तेच्या नशेत गुंग झालात', अण्णा हजारेंची केजरीवालांवर पत्रातून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:57 IST

Anna Hazare-Arvind Kejriwal: 'ऐतिहासिक चळवळ उद्ध्वस्त करून स्थापन झालेला तुमचा पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जाऊ लागला, हे अत्यंत दुःखद आहे.'

Anna Hazare Letter To Arvind Kejriwal: दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्यावरुन सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे(Anna Hazare) यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अण्णा हजारे यांनी दारू धोरणावरुन केजरीवालांना फटकारले. अण्णा हजारे म्हणाले की, 'तुमच्या सरकारने लोकांचे जीवन उद्धवस्त करणारे, महिलांवर परिणाम करणारे दारू धोरण आणले. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात कमालीचा फरक आहे.'

'तुम्ही वेगळा मार्ग निवडला'अण्णांनी पत्रात पुढे लिहिले की, '10 वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2012 रोजी टीम अण्णाची दिल्लीत बैठक झाली होती, त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग स्वीकारण्यावर भाष्य केले होते. पण राजकीय पक्ष काढणे हे आपले उद्दिष्ट कधीच नव्हते, हे तुम्ही विसरलात आणि वेगळा मार्ग निवडला. त्यावेळी जनतेच्या मनात टीम अण्णाबद्दल एक विश्वास निर्माण झाला होता. तेव्हा मला वाटले होते की, टीम अण्णाने देशभर फिरून लोकशिक्षण, जनजागृतीचे करायला हवे. या दिशेने काम झाले असते, तर दारूबाबत असे चुकीचे धोरण कुठेही आले नसते.'

'आप इतर पक्षांप्रमाणेच'अण्णा हजारे पुढे म्हणतात की, 'सरकार कोणत्याही पक्षाचे असो, सरकारला जनहिताचे काम करण्यास भाग पाडण्यासाठी समविचारी लोकांचा दबावगट असणे गरजेचे होते. तसे झाले असते तर देशात परिस्थिती वेगळी असती आणि गरिबांना फायदा झाला असता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. तुम्ही, मनीष सिसोदिया आणि अन्य सहकाऱ्यांनी मिळून पक्ष स्थापन केला. ऐतिहासिक चळवळ उद्ध्वस्त करून स्थापन झालेला पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जाऊ लागला, हे अत्यंत दुःखद आहे.'

'तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक''भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी ऐतिहासिक आणि लोकनियुक्त आंदोलन झाले, त्यात लाखो लोक आले. त्यावेळी तुम्ही लोकायुक्तांची गरज असल्याबद्दल मंचावरून मोठमोठी भाषणे दिली. आदर्श राजकारण आणि व्यवस्थेचे विचार तुम्ही मांडले होते. पण दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्त कायदा विसरलात. मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला आदर्श विचारसरणीचा विसर पडला. तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे दारू धोरण आणले. यावरून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत असल्याचे दिसून येते.

'सत्तेच्या नशेत गुंग झालात...'''स्वराज' नावाच्या पुस्तकात तुम्ही कितीतरी आदर्श गोष्टी लिहिल्या होत्या. तेव्हा तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण राजकारणात गेल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही आदर्श विचारसरणीचा विसर पडल्याचे दिसत आहे.  जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेची नशा असते. तुम्हीही अशा सत्तेच्या नशेत गुंग झालात. त्यामुळेच दिल्ली राज्यात तुमच्या सरकारने नवीन दारू धोरण तयार केले. त्यातूनच दारू विक्री आणि मद्यपानाला चालना मिळू लागली. या धोरणामुळे गल्लीबोळात दारूची दुकाने सुरू करता येतील आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळेल, ही बाब जनतेच्या हिताची नाही,' असंही अण्णा आपल्या पत्रात म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप