शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंविरोधात वेगवेगळ्या कोर्टात दावा अंजली दमानिया: दिवसभर कागदपत्रे मिळविण्यासाठी खटपट; एकीकडे क्लिन चिट दुसरीकडे आारोपांच्या फैरी

By admin | Updated: June 22, 2016 22:04 IST

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आपण दावा दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बुधवारी दमानिया यांनी शहरातील काही बांधकामे, एमआयडीसीतील प्लॉटची पाहणी करून त्यांची छायाचित्र व कागदपत्रे मिळविली.

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आपण दावा दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बुधवारी दमानिया यांनी शहरातील काही बांधकामे, एमआयडीसीतील प्लॉटची पाहणी करून त्यांची छायाचित्र व कागदपत्रे मिळविली.
माजी महसूल, कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधातील विविध प्रकरणांवरून चर्चेत आलेल्या मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या खडसे यांनी राजीनामा देण्यापूर्वी शहरात आल्या होत्या त्यानंतर त्यांनी मंुबईत केलेले उपोषण, त्यावरून खडसेंना राजीनामा देण्याची आलेली वेळ या प्रकारानंतरच्या खळबळजनक घडामोडीनंतर दमानिया या बुधवारी अचानक जळगावात प्रकटल्या.
दिवसभर अनेक ठिकाणी भेटी
दमानिया यांनी सकाळपासून अनेक ठिकाणी भेटी दिल्या.
- सकाळी मेहरूण परिसरातील बांधकाम व्यावसायिक श्रीकांत व श्रीराम खटोड यांच्या शिरसोली रोडवरील बांधकामांची पाहणी करून छायाचित्रे घेतली.
- औद्योगिक क्षेत्रात जाऊन एमआयडीसीतील आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांना दिलेल्या जागेची पाहणी केली.
- औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या कार्यालयात जाऊन जामनेर येथील नियोजित टेक्सटाईल पार्कच्या जागेबाबत कागदपत्रांची मागणी केली
-माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्या नजीकच्या पूजा अपार्टमेंटची छायाचित्रे घेतली.
- सहकार व मुद्रांक शुल्क कार्यालयाकडेही त्या गेल्या होत्या. मात्र कार्यालयात जाणे त्यांनी टाळले.
- शहरातील काही राजकीय पदाधिकार्‍यांच्या जागांबाबतही त्यांनी माहिती घेतली.
-----
- दमानिया यांच्या पहिल्या भेटीच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरविणार्‍या काही जणांचा घोळका होता मात्र यावेळी त्यांनी अनेकांना टाळल्याचे दिसून आले.
-दमानिया यांच्या सोबत आपचे जिल्‘ातील नेते डॉ. सुनील गाजरे हेच बर्‍याच ठिकाणी होते.
---
खडसेंविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी दावा
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वेगवेगळ्या प्रकरणांचा वेगवेगळ्या न्यायालयात आपण दावा दाखल करणार असल्याचे दमानिया यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. त्या म्हणाल्या, खडसेंनी आपल्या विरोधात १०० कोटींचा अबु्र नुकसानीचा दावा दाखल केला आहे, याप्रश्नी आपण आनंदी (हॅपी) आहोत, त्यास सामोरे जाऊ.