शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
6
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
7
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
10
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
11
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
12
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
13
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
14
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
15
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
16
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
17
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
18
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
19
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
20
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

लग्नमंडप अक्षदा पडण्यापूर्वीच सोडण्याची दुर्दैवी वेळ हृदयद्रावक : मेहुण्यांचा मृत्यू झाल्याने घरातच झाला अनिल पवारचा विवाह

By admin | Updated: March 29, 2016 00:25 IST

जळगाव : लग्न सोहळा म्हटले की, आबालवृद्धांच्या आनंदाला उधाण येते. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण. हाच मंगलमय क्षण अनुभवणार्‍या अनिल पवारच्या बाबतीत मात्र, फारच अघटित घडले. नियतीच्या विचित्र खेळीने पवार कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. त्याच्या लग्नासाठी उभारलेल्या मंडपात वर्‍हाडी मंडळींकडून अक्षदा पडण्यापूर्वीच हा मंडप सोडण्याची दुर्दैवी वेळ आली. अनिलच्या हळदीच्या दिवशी त्याच्या चुलत मेहुण्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी घरातच साध्या पद्धतीने विवाह झाला.

जळगाव : लग्न सोहळा म्हटले की, आबालवृद्धांच्या आनंदाला उधाण येते. प्रत्येकाच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण. हाच मंगलमय क्षण अनुभवणार्‍या अनिल पवारच्या बाबतीत मात्र, फारच अघटित घडले. नियतीच्या विचित्र खेळीने पवार कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. त्याच्या लग्नासाठी उभारलेल्या मंडपात वर्‍हाडी मंडळींकडून अक्षदा पडण्यापूर्वीच हा मंडप सोडण्याची दुर्दैवी वेळ आली. अनिलच्या हळदीच्या दिवशी त्याच्या चुलत मेहुण्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी घरातच साध्या पद्धतीने विवाह झाला.
ममुराबाद रस्त्यावरील पवननगरात राहणारा अनिल रमेश पवार याचा विवाह सुरत येथील रहिवासी अशोक कदम यांच्या मुलीशी ठरलेला होता. २७ मार्चला सायंकाळी हळद समारंभ होता. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर पाहुणे मंडळीची जेवणाची पंगत बसलेली होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना अचानक लग्न मंडपाच्या काही लोखंडी पाईपमध्ये विजेचा प्रवाह उतरला. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर अनिलचे चुलत मेहुणे जितेंद्र बळीराम मराठे (वय ३२, रा.थाळनेर, ता.शिरपूर) हे हात धुण्यासाठी मंडपाच्या बाहेर जात होते. त्याच वेळी पाईपला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या प्रकाराने मंडपात गोंधळ उडाला. पळापळीत रेखा संतोष जगताप (वय ४०, रा.तळवेल), ज्योती संजय चौधरी (वय २५, रा.चौघुले प्लॉट, जळगाव) व भरत ओंकार पवार (वय ६०, रा.पवननगर, जळगाव) यांनाही विजेचा धक्का बसला. काही लोकांनी प्रसंगावधान राखत वीज प्रवाह खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर जखमींना नागरिकांनी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी जितेंद्र मराठे यांना मृत घोषित केल्याने एकच शोककळा पसरली.
घरात झाला विवाह
लग्नासाठी दोन्ही पक्षाकडील वर्‍हाडी मंडळी बाहेरगावाहून जळगावला येण्यासाठी निघालेली होती. वधू पक्षाकडील वर्‍हाडीदेखील सुरतहून रविवारी सायंकाळीच निघालेले होते. त्यानंतर रात्रीच्या ११ वाजता अशी दुर्दैवी घटना घडल्याने त्यांना रस्त्यातूनच परत पाठवणे शक्य नव्हते. तसेच वधू-वरांना हळद लावण्यात आली होती. म्हणून विवाह पुढे ढकलणे अशक्य होते. म्हणून दोन्ही पक्षाकडील ज्येष्ठ मंडळींनी पुढे येऊन विवाह तिथीनुसार मात्र, घरातच साध्या पद्धतीने लावण्याचे ठरवले. त्यानुसार सोमवारी सकाळी हा विवाह झाला.